शासनाच्या यादीत बाळासाहेब राष्ट्रपुरुष; Uddhav Thackeray यांना हे मान्य नाही का?

192
शासनाच्या यादीत बाळासाहेब राष्ट्रपुरुष; Uddhav Thackeray यांना हे मान्य नाही का?

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्व खुद्द त्यांचे पुत्र आणि उबाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडूनच कमी केले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा माझ्या वडिलांचे नाव चोरल्याचा पुनरुच्चार करत माझे वडील चोरायचे नाही. अरे माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट सांगताय तुम्ही अशा शब्दांत भाजपासह शिवसेनेवर टीका केली. परंतु उद्धव ठाकरे यांना आता आपले वडील बाळासाहेब ठाकरे थोर तथा राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट आहेत, हे समजून घेतले पाहिजे. थोर पुरुषांचा तथा राष्ट्रपुरुषांचा फोटो लावण्याचा अधिकारी प्रत्येक जनतेला तथा अनुयायांना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना आजही थोर तथा राष्ट्रपुरुष मानत नसून अशाप्रकारचे आरोप करत ते एकप्रकारे बाळासाहेबांचे महत्त्वच कमी करत असल्याचे बोलले जात आहे. (Uddhav Thackeray)

शिवसेना पक्षाच्या ५८व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात षण्मुखानंद सभागृहात बोलतांना शिवसेना आणि भाजपाला उद्धव यांनी आव्हान दिले. षंढ नसाल तर बाळासाहेबांचा फोटो न लावता, शिवसेनेचे नाव न लावता आणि धनुष्यबाणाचे चिन्ह न लावता लढून दाखवा, नाही तर षंढ म्हणून गावात फिरा…, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)

राज्यातील तत्कालिन ठाकरे सरकारने सन २०२१ मध्ये राष्ट्रपुरुष तथा थोर व्यक्तींची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत १५ डिसेंबर २०२० मध्ये एक परिपत्रक जारी केले. ज्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे बाळासाहेब हे केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे वडील नसून ते एक थोर पुरुष आहेत. त्यामुळे थोर पुरुषांचा फोटो कुणी वापरु नये अशाप्रकाची बंदी कुणाकडूनही केली जाऊ शकत नाही. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक अनुयायी आणि चाहत्यांना त्यांचा फोटा लावण्याचा अधिकार आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – Sanjay Raut यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन वारकरी संतापले!)

बाळासाहेबांच्या नावाचा समावेश थोर पुरुषांच्या यादीत करण्यापूर्वी त्यांच्या निधनानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील महापौर निवासाच्या जागेवर बाळासाहेबांचे भव्य राष्ट्रीय स्मारक शासकीय निधीतून एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु आहे, हेही बाळासाहेबांच्या तमाम जनतेच्या हृदयात असलेल्या स्थानामुळेच. बाळासाहेबांच्या नावाचा समावेश राष्ट्रपुरुषांच्या यादीत झाला असला तरी बाळासाहेबांचे स्थान हे प्रत्येक भारतीयांच्या हृदयात आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे आपले वडील असून त्यांना चोरुन नेले, त्यांचे नाव व फोटो वापरला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून केला जात असला तरी बाळासाहेब ही काही उद्धव ठाकरेंची वैयक्तिक मालमत्ता नाही. बाळासाहेब हे राष्ट्राला समर्पित असल्याने उद्धव ठाकरे त्यांचा फोटो आणि नाव न वापरण्याचे आवाहन करत एकप्रकारे त्यांचे महत्त्वच कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. (Uddhav Thackeray)

आज उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचा फोटो वापरु नका म्हणून सांगत असतील तर छत्रपती शिवाजी महाराज, उद्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, मोहनदास गांधी, पंडित नेहरु आदी राष्ट्रपुरुषांच्या तथा थोर पुरुषांच्या वारसदारांकडूनही अशाचप्रकारे फोटो न लावण्याचे आवाहन केले जाऊ शकते. परंतु उद्धव ठाकरे वगळता कुणीही फोटो न लावण्याचे आवाहन केले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब आपले वडील असले तरी ते एक राष्ट्रपुरुष असून त्यांचा फोटो न लावण्यासंदर्भात बोलणे हे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.