Uddhav Thackeray यांनीच तथाकथित सामाजिक विश्लेषकांचा फाडला बुरखा

218
Uddhav Thackeray यांनीच तथाकथित सामाजिक विश्लेषकांचा फाडला बुरखा

शिवसेना उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आणि मुस्लिम मतांवर ९ खासदार निवडून आणले. हाच ‘सिलसिला’ विधानसभेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी त्यांनी निवडणूक झाल्यानंतरही भाषणाच्या सुरुवातीला ‘हिंदू बांधव-भगिनी-माता’ असे संबोधन करणे कायमचे सोडून दिल्याचे समजते. त्याचबरोबर ठाकरे यांनी बुधवारी १९ जूनला पक्षाच्या एका कार्यक्रमात तथाकथित सामाजिक विश्लेषकांचा बुरखा फाडला आणि त्यांना उघडे पाडले. (Uddhav Thackeray)

भाषणाच्या सुरुवातीलाच भ्रमनिरास

लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे ‘माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी करतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती मात्र ती फोल ठरली. भाषणाची सुरुवात त्यांनी ‘मर्द, लढवय्या शिवसैनिक..’ अशी केली आणि उपस्थितांचा भ्रमनिरास झाला. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – भाजपामध्ये घरवापसी होताच Eknath Khadse यांना मोठी जबाबदारी दिली जाणार ?)

खोट्या चेहेऱ्यामागचे खरे गणित उघडे

काही तथाकथित सामाजिक विश्लेषकांचा बुरखा फाडताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काही स्वयंसेवी संस्थांचालक आणि काही यु-ट्यूबर्स विश्वंभर चौधरी, असीम सरोदे, निखिल वागळे, हेमंत देसाई तसेच रविष कुमार, ध्रुव राठी अशा अनेकांनी इंडि आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि आम्हाला मतदान होण्यासाठी आमचा प्रचार केला,” असे सांगून एकप्रकारे खोट्या चेहऱ्यामागचे खरे गणित उघडे पाडले. (Uddhav Thackeray)

राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या

यामुळे सामाजिक ज्ञान आणि बौद्धिक देण्याच्या नावाखाली, पडद्याआडून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना प्रचारात मदत करणाऱ्यांचे खरे रूप उघड झाले. आधीच कार्यकर्ते आणि नेत्यांचा दुष्काळ पडलेल्या महाविकास आघाडीने राजकीय महत्वाकांक्षा वाढलेल्या सरोदे, वागळे यांना उद्या विधानसभेचे तिकीट दिले तर आश्चर्य वाटू नये, अशी चर्चा सामाजिक संघटनांमध्ये होताना दिसून येत आहे. (Uddhav Thackeray)

मुस्लिमबहुल भागात उबाठाची मते वाढली

हिंदुत्वाचा त्याग आणि या तथाकथित सामाजिक विश्लेषकांच्या प्रचारामुळे शिवसेना उबाठाची मोठ्या प्रमाणात विशेषतः मुंबईतील लोकसभा मतदार संघांत मुस्लिम समाजाची मते वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. दक्षिण मुंबईतील मुंबादेवी आणि भायखळा या दोन विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला ७७ हजार मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला १.६४ लाखांहून अधिक मते पडली. मुंबई दक्षिण-मध्य मध्ये अणुशक्ती नगर आणि धारावी विधानसभा क्षेत्रात महायुतीला सुमारे ९० हजार तर महाविकास आघाडीला दीड लाखांहून जास्त मते मिळाली. ईशान्य मुंबई मतदार संघातील मानखुर्द भागात (आमदार अबू आझमी) तर महायुतीला केवळ २८ हजार आणि महाविकास आघाडीला १.१६ लाख मतदान झाले. तर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातील कुर्ला आणि वांद्रे पूर्व भागात लाखभर मतदान महायुतीला झाले आणि महाविकास आघाडीला जवळपास १.५७ लाख इतके मतदान झाले. (Uddhav Thackeray)

‘टेम्पो’ कायम ठेवण्याचे प्रयत्न

हा मुस्लिम पाठिंब्याचा ‘टेम्पो’ कायम ठेवण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असून त्यासाठी त्यांनी ‘हिंदुत्व’ आणि ‘मराठी माणूस’ हे मुद्दे एका अर्थाने सध्या तरी ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये ठेवल्याचे दिसून येत आहे. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.