जेष्ठ चित्रपट अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या अंधेरी येथील कार्यालयात घरफोडी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी खेर यांच्या कार्यालयातून ‘मैने गांधी को नही मारा’ चित्रपटाच्या रीळसह ४ लाख १५ हजारांची रोकड चोरी करून पळ काढला. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून चोरट्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Anupam Kher)
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचे अंधेरी वीरा देसाई रोड, आझाद नगर ३ येथील अनुपम सोसायटी या इमारतीत कार्यालय आहे. खेर यांचे व्यवस्थापक प्रवीण पाटील आणि इतर तीन कर्मचारी या कार्यालयात काम करतात. बुधवारी रात्री ९:३० वाजता पाटील यांनी नेहमीप्रमाणे कार्यालय बंद करून निघून गेले होते. गुरुवारी सकाळी ९:३० वाजता पाटील हे कार्यालयाकडे जाण्यास निघाले असता त्यांना एका कर्मचाऱ्याचा फोन आला, त्याने कार्यालयात चोरी झाल्याची माहिती पाटील यांना दिली. (Anupam Kher)
(हेही वाचा – NEET परीक्षा रद्द होणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांचे मोठे वक्तव्य)
पाटील हे कार्यालयात आले असता कार्यालयाचा मुख्य दाराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून कार्यालयातील तिजोरी तोडून रोकड आणि ‘मैने गांधी को नही मारा’ चित्रपटाची रीळ असलेली पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आले. पाटील यांनी तात्काळ ही माहिती अनुपम खेर यांना दिली, १०:३० च्या सुमारास खेर हे आंबोली पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा केला असता ४ लाख १५ हजार रुपयांच्या रोकडसह चित्रपटाचे रीळ असलेली बॅग चोरीला गेल्याचे समोर आले. (Anupam Kher)
आंबोली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून इमारतीत लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अनोळखी इसम चोरीचे कृत्य करताना दिसून येत आहे. या चोरट्यांचा शोधासाठी आंबोली पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक तसेच गुन्हे शाखा कक्ष ९ चे पथक शोध घेत आहे. या चोरीच्या घटनेनंतर अनुपम खेर यांनी इन्स्टाग्राम आणि ‘एक्स’ या ट्विटर हँडलवर या चोरीच्या घटनेची पोस्ट टाकली आहे. (Anupam Kher)
कल रात मेरे वीरा देसाई रोड वाले ऑफ़िस में दो चोरों ने मेरे ऑफ़िस के दो दरवाज़ों को तोड़ा और अकाउंटस डिपार्टमेंट से पूरा सेफ़ (जो शायद वो तोड़ नहीं पाये) और हमारी कंपनी द्वारा निर्मित एक फ़िल्म के नेगेटिव जो एक बॉक्स में थे, चुराकर ले गए।हमारे ऑफिस ने FIR करवा दिया है।और पुलिस ने… pic.twitter.com/aqmjfOINEM
— Anupam Kher (@AnupamPKher) June 20, 2024
अनुपम खेर यांची पोस्ट
“काल रात्री वीरा देसाई रोडवरील माझ्या कार्यालयात दोन चोरट्यांनी माझ्या कार्यालयाचे दोन दरवाजे तोडून लेखा विभागातील संपूर्ण तिजोरी (जो कदाचित त्यांना तोडू शकला नसावा) आणि आमच्या कंपनीने बनवलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह बॉक्स चोरून नेले. आमच्या कार्यालयाने एफआयआर दाखल केला आहे आणि ते दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सामानासह बसलेले दिसले आहेत” अशी पोस्ट अनुपम खैर यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. (Anupam Kher)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community