International Yoga Day 2024 : भारताची जगाला अनमोल भेट; आंतरराष्ट्रीय योग दिन

98
International Yoga Day 2024 : भारताची जगाला अनमोल भेट; आंतरराष्ट्रीय योग दिन
International Yoga Day 2024 : भारताची जगाला अनमोल भेट; आंतरराष्ट्रीय योग दिन

दरवर्षी २१ जून रोजी संपूर्ण जग एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा (International Yoga Day 2024) करतं. योग हा एक प्राचीन भारतीय शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सराव आहे, जो शारीरिक आरोग्य, मानसिक शांती आणि आत्म-साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी केला जातो. (International Yoga Day 2024)

(हेही वाचा- Mumbai Metro: पावसामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या, कसे असेल वेळापत्रक ? वाचा सविस्तर)

भारतात अनेक वर्षांपूर्वी योगाचा शोध लागला. मग ऋषीमुनींनी त्याचे महत्त्व समजून प्रसार केला. योग हा शब्द संस्कृत शब्द “युज” वरून आला आहे, ज्याचा अर्थ “सामील होणे” किंवा “एकत्रित होणे” असा आहे आणि मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद आणण्याच्या तत्त्वज्ञानाचे प्रतीक आहे. योग म्हणजे केवळ शारीरिक आसने नसून त्याहीपेक्षा बरेच काही आहे. अध्यात्मातही योगसाधनेला महत्व प्राप्त झाले आहे. (International Yoga Day 2024)

२०१४ मध्ये मोदी सरकार आल्यापासून दरवर्षी २१ जून रोजी योग दिन साजरा केला जातो. ६९ व्या संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान मोदींनी स्वतः योग दिनाचा प्रस्ताव ठेवला होता. ११ डिसेंबर २०१४ रोजी सर्व १९३ यूएन सदस्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली. हा प्रस्ताव मान्य होताच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. (International Yoga Day 2024)

(हेही वाचा- Accident: नागपूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ३ वाहनांचा अपघात, २० हून अधिक प्रवासी जखमी)

२१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा (International Yoga Day 2024) पहिला उत्सव साजरा करण्यात आला. योगाचे जन्मस्थान म्हणून भारत हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतो. विविध सरकारी आणि गैर-सरकारी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि योग संस्था आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करतात. या दिवशी पंतप्रधान आणि इतर उच्च अधिकारी देखील योगाभ्यास करताना दिसतात. योग केल्याने तुम्हाला शारीरिक शांती तर मिळतेच पण त्याचबरोबर तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. (International Yoga Day 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.