Mumbai Metro: पावसामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या, कसे असेल वेळापत्रक ? वाचा सविस्तर

पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो मार्गावर सध्या गर्दीच्या वेळी दर ७ मिनिटाला एक मेट्रो धावते.

175
Mumbai Metro: पावसामुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या, कसे असेल वेळापत्रक ? वाचा सविस्तर

मेट्रो २ अ किंवा ७ मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांचा मेट्रो प्रवासाकडे कल वाढला आहे. त्याची दखल घेत एमएमआरडीएने मेट्रो मार्गावर (Mumbai Metro) शुक्रवार, (२१ जून)पासून २४ जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दररोज २८२ मेट्रो फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो (Mumbai Metro) मार्गावर सध्या गर्दीच्या वेळी दर ७ मिनिटाला एक मेट्रो धावते. मात्र प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत एमएमआरडीएने आपल्या सेवेत आणखी एक मेट्रो ट्रेन आणली आहे. त्यामुळे दिवसभरात २४ अतिरिक्त  फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – Airport Runways: धावपट्टीचा होणार ‘ओएलएस’ सर्व्हे, कारण काय ? जाणून घ्या…)

आपत्कालीन काळात मेट्रो सेवेत वाढ
याशिवाय ३ मेट्रो गाड्या राखीव ठेवल्या असल्याने, आपत्कालीन काळात गरजेनुसार मेट्रो सेवेत अधिकची वाढ करता येईल. अलीकडेच मुंबई मेट्रोने प्रवासी संख्येचा उच्चांक गाठला होता. एकाच दिवसात तब्बल २ लाख ६० हजार ४७१ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.