आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज योगाभ्यास करणे आवश्यक आहे. दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे योग दिन साजरा करण्याची सुरुवात भारतातून झाली. या दिवशी देशभरातील लोक योगाभ्यास करतात. आंतरराष्ट्रीय योग दिन पहिल्यांदा 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. योग मानवी शरीरासाठी आणि मनासाठी खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने लोक अनेक आजार टाळू शकतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात वर्षे वाढतात.
#WATCH : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जवानांनी १५,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर केली योगासने
.
.
.#IndianArmy #viral #Snow #Yoga #InternationalYogaDay2024 #परमात्मा_का_पृथ्वी_पर_आगमन #INDvsAFG #UGCNET #Resign_Stalin #Hindusthanpost #MarathiNews pic.twitter.com/LGxnCL0YRO— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 21, 2024
Indo-Tibetan Border Police (ITBP) performs Yoga alongside Pangong Tso lake in Ladakh, on the occasion of #InternationalYogaDay pic.twitter.com/lmWaQduxtR
— ANI (@ANI) June 21, 2021
भारतीय सैनिकांनीही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा करून योग दिन साजरा केला. भारत-तिबेट सीमा पोलिसांनी लडाखमधील पँगोंग त्सो तलावाच्या किनाऱ्यावर योगाभ्यास केला. तसेच, लोहितपूर येथील अरुणाचल प्रदेश पशु प्रशिक्षण शाळेतील आय. टी. बी. पी. च्या जवानांनी घोड्यांच्या साथीने योगासने केली तसेच उत्तर सिक्कीमधील मुगुथांग सब सेक्टर येथे १५,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर योगासने करून योग दिनाचे महत्त्व पटवून दिले.
(हेही वाचा – International Yoga Day 2024 : भारताची जगाला अनमोल भेट; आंतरराष्ट्रीय योग दिन)
जम्मूमध्ये सी. आर. पी. एफ. च्या जवानांनीही केला योगा
शिवाय, भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या सैनिकांनी लडाखमध्ये 18,000 फूट उंचीवर योग दिन साजरा केला. जम्मूमध्ये सी. आर. पी. एफ. च्या जवानांनीही योगा केला. लडाखमधील सीमा चौकीजवळ 15,000 फूट उंचीवर आयटीबीपीच्या जवानांनी केलेल्या योगासनांचा व्हिडियो सर्वत्र व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयटीबीपीच्या जवानांनी उत्तर सिक्कीमधील मुगुथांग सब सेक्टर येथे 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर योगासने केली.
हेही पहा –
Arunachal Pradesh: ITBP (Indo-Tibetan Border Police) personnel of Animal Training School (ATS), Lohitpur perform yoga, with horses, on #InternationalDayOfYoga pic.twitter.com/q28mY9oo8v
— ANI (@ANI) June 21, 2021