हिंदी लेखक Vishnu Prabhakar

100
हिंदी लेखक Vishnu Prabhakar
हिंदी लेखक Vishnu Prabhakar

विष्णू प्रभाकर (Vishnu Prabhakar) हे एक भारतीय हिंदी भाषेतले प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी अनेक लघुकथा, कादंबऱ्या, नाटके, पर्यटनाच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यांच्या लिखाणात राष्ट्रप्रेम आणि सामाजिक विकास हे विषय प्रामुख्याने आढळतात. (Vishnu Prabhakar)

विष्णू प्रभाकर (Vishnu Prabhakar) यांचा जन्म २१ जून १९१२ साली उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातल्या मिरापूर नावाच्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव दुर्गा प्रसाद असं होतं. ते एक सज्जन आणि धार्मिक विचारांचे व्यक्ती होते. विष्णू प्रभाकर यांच्या आईचं नाव महादेवी असं होतं. त्या सुशिक्षित गृहिणी होत्या. आपल्या काळात त्यांनी डोक्यावरून पदर घेण्याच्या प्रथेला विरोध केला होता. (Vishnu Prabhakar)

(हेही वाचा- International Yoga Day 2024 : भारताची जगाला अनमोल भेट; आंतरराष्ट्रीय योग दिन)

विष्णू प्रभाकर (Vishnu Prabhakar) यांचं सुरुवातीचं शिक्षण मिरापूर येथे झालं. त्यानंतर ते त्या काळच्या पंजाब येथील हिसार येथे आपल्या मामांच्या घरी राहायला गेले. पण घरची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती. त्यामुळे विष्णू प्रभाकर यांना पुढे फारसं शिकता आलं नाही. पण आपलं घर चालवण्यासाठी ते एक सरकारी नोकरी करायला लागले. त्यांना शिकण्याची खूप इच्छा होती. म्हणून मग त्यांनी नोकरी सांभाळून आपलं शिक्षणही पुढे सुरू ठेवलं. ते चतुर्थ वर्गीय कर्मचारी म्हणून काम करायचे. त्यावेळी त्यांना महिना रु. १८ एवढा पगार होता. (Vishnu Prabhakar)

विष्णू प्रभाकर (Vishnu Prabhakar) यांनी हिंदी विषयात ‘हिंदी भूषण’ ही पदवी मिळवली. तर संस्कृत विषयात प्रज्ञा परीक्षा उत्तीर्ण झाले. एवढंच नाही तर त्यांनी इंग्रजी विषयात बी.ए. ची पदवी मिळवली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांनी आपल्या लेखणीलाच आपली तलवार बनवली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतला होता. प्रेमचंद, यशपाल, जैनेंद्र आणि अज्ञेय हे त्यांचे समकालीन लेखक होते. पण तरीही विष्णू प्रभाकर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली होती. (Vishnu Prabhakar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.