रिल बनवण्याच्या नादात अनेकजण जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार कात्रज (PUNE) नव्या बोगद्याजवळील दरी पुलाजवळ घडला. येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका बंद इमारतीच्या छतावरून तरुण-तरुणीने धोकादायकरित्या रिल बनवले. हे रिल वेगाने प्रसारित होताच भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये एका बंद पडलेल्या इमारतीच्या छतावर तरुण झोपला असून त्याच्या हाताला धरून तरुणी खाली लटकताना दिसत आहे. येथून खाली पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गही दिसत आहे. या तरुणीने हाताशिवाय कशाचाच आधार घेतलेला दिसत नाही. मागील काही दिवसांत हा रिल समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. हा पडिक बंगला पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळील असल्याचे दिसते. भारती विद्यापीठ पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन भादंवि कलम ३३६ आणि ३३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा – International Yoga Day: आयटीबीपीच्या जवानांनी 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर केली योगासने, Video पहा)
व्हिडिओत काय दिसतं?
ःः या इमारतीवर चढून तरुण आणि तरुणी स्टंटबाजी करताना दिसत आहेत. ग्रीप स्ट्रेंथ चेक म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे, हे तपासण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याचे लिहून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. दोन ते तीन मजली उंच इमारतीएवढ्या उंचीवरून तरुणी या तरुणाचा हात पकडून अधांतरी लटकत असल्याचे दिसत आहे. हा परिसर स्वामी नारायण मंदिराजवळ आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांबरोबर त्यांचा हा स्टंट चित्रीत करणारे तरुण देखील व्हिडिओत दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवरून संबंधित तरुण-तरुणीवर टीका केली आहे.
तरुण-तरुणीविरोधात गुन्हा दाखल
हा रिल पंधरा दिवसांपूर्वी बनवलेला दिसत आहे. सध्या आम्ही अज्ञात तरुण-तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. समाजमाध्यमातील खात्यावरून रिल बनविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community