- ऋजुता लुकतुके
अफगाणिस्तान विरुद्धचा पहिला सुपर ८ सामना खेळताना भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरला होता. माजी कसोटीपटू डेव्हिड जॉनसन (David Johnson Death) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघाने काळी पट्टी बांधली होती. ५२ वर्षीय जॉनसन यांचं बंगळुरूमध्ये निधन झालं. त्यांच्या घराच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीतून पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. १९९६ मध्ये जॉनसन २ कसोटी सामने भारतासाठी खेळले होते. यात त्यांनी ३ बळी मिळवले होते. (David Johnson Death)
(हेही वाचा- Karungali Malai: या पावसाळ्यात करुंगली मलाईचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर ‘हे’ नक्की वाचा)
जॉनसन यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं आहेत. अलीकडे त्यांची प्रकृती बरी नव्हती. ‘अपघातानंतर जॉनसन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं,’ असं कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं. कर्नाटककडे वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad), डोड्डा गणेश (Dodda Ganesh), अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि जवागल श्रीनाथ असं तगडं चौकुट असताना जॉनसन यांनी कर्नाटक संघात आपली जागा पक्की केली होती. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah), जॉनसन यांचा सहकारी डोड्डा गणेश यांनी ट्विटरवर जॉनसन यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. (David Johnson Death)
Deepest condolences to family and friends of our former Indian fast bowler David Johnson. His contributions to the game will always be remembered 🙏
— Jay Shah (@JayShah) June 20, 2024
Saddened to hear the passing of my cricketing colleague David Johnson. Heartfelt condolences to his family. Gone too soon “ Benny”!
— Anil Kumble (@anilkumble1074) June 20, 2024
देशांतर्गत क्रिकेटमध्ये डेव्हिड जॉनसन यांनी ३९ सामन्यांत १२५ बळी मिळवले होते. १९५-९६ रणजी हंगामात ते सर्वाधिक फॉर्मात होते. केरळ विरुद्ध १५२ धावांत १० बळी घेत त्यांनी निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधलं होतं. तिथून भारतीय संघात त्यांची वर्णी लागली. १९९६ च्या ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्यात ते दिल्ली कसोटीत खेळले. इथं त्यांना सुरुवातीच्या षटकांत मायकेल स्लेटरचा बळीही मिळाला. त्यामुळे त्यांची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाली. तिथेही एका कसोटीत त्यांनी हर्शेल गिब्ज आणि ब्रायन मॅकमिलन असे दोन बळी मिळवले. चांगल्या कामगिरीनंतरही त्यांना भारतीय संघातील स्थान टिकवणं शक्य झालं नाही. (David Johnson Death)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community