भाजपा अध्यक्षपदाच्या शर्यतीत Vinod Tawde आघाडीवर

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा मराठी माणसाची वर्णी लागण्याची शक्यता बळावत चालली आहे. यावेळी ही लॉटरी विनोद तावडे यांना लागण्याची शक्यता आहे. यापूर्वी नितीन गडकरी यांची अध्यक्ष पदी निवड झाली होती.

214
Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी तावडेंचा मोठा डाव
  • वंदना बर्वे

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात लागलेला निकाल भाजपाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. अवघ्या चार-पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या निकालाची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. (Vinod Tawde)

लोकसभा निकलानंतर महायुतीतील पक्षांमध्ये लाव्हा खदखदत आहे. हा लाव्हा शांत करणे भाजपा हायकमांडची पहिली प्राथमिकता आहे. याशिवाय मराठा आरक्षण हाही एक महत्त्वाचा मुद्दा सरकारपुढे उभा आहे. यासाठी सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. (Vinod Tawde)

(हेही वाचा – Delhi Excise Scam: अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामिनाला स्‍थगिती?)

महाराष्ट्रातील महायुतीच्या पक्षातील लाव्हा शांत करण्यासाठी महासचिव विनोद तावडे यांना भाजपाचे अध्यक्ष बनविले जाऊ शकते. नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाचा शोध सुरु आहे. (Vinod Tawde)

विनोद तावडे यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारमध्ये चांगले यश मिळविले आहे. याशिवाय तावडे शहा यांच्या अगदी जवळचे मानले जातात. हायकामांडने सध्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यास नकार दिला आहे. मात्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये नवीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे.  (Vinod Tawde)

(हेही वाचा – Police Recruitment: ‘या’ जिल्ह्यात पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित, जाणून घ्या कारण…)

भाजपाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा देशाचे आरोग्य आणि खते व रसायन मंत्री झाले आहेत. शिवाय, त्यांचा कार्यकाळ सुद्धा संपला आहे. यामुळे भाजपाचा नवीन अध्यक्ष लवकरच निवडला जाण्याची शक्यता आहे. (Vinod Tawde)

भाजपाचा नवीन अध्यक्ष विद्यमान महासचिव यांच्यातून होणार असल्याची चर्चा आहे. सध्या सात महासचिव आहेत. पण त्यात एकही महिला नाही. आता महिलांना स्थान मिळणार काय? हा प्रश्न आहे. स्मृती इराणी पराभूत झाल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन संघटनेत होणार काय? याकडे लक्ष लागून राहणार आहे. नड्डा यांच्या टीममध्ये ३८ नेते आहेत. पैकी ५ राष्ट्रीय उपाध्यक्ष व ४ राष्ट्रीय सचिव महिला आहेत. महासचिवपदी एकही महिला नाही. (Vinod Tawde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.