नौदलाकडे ६ अत्याधुनिक पाणबुड्या येणार! किती कोटींचा आहे प्रकल्प? वाचा… 

138

केंद्र सरकार एका बाजुला जरी जागतिक महामारीसोबत लढत असले, तरी संरक्षण विभागाला अधिकाधिक मजबूत करण्याच्या धोरणाकडे दुर्लक्ष केलेले नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. नौदलाला अधिकधिक सक्षम बनवण्याच्या हेतूने केंद्र सरकारने ‘प्रोजेक्ट -७५ इंडिया’ या अंतर्गत ६ स्टील्थ जातीच्या पाणबुड्या बनवण्याचे ठरवले आहे. दरवर्षी १ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात जमा होण्याच्या दृष्टीने सरकारचे यशस्वी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने ६ पानबुड्या बनवण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांचे टेंडर काढण्यास परवानगी दिली आहे. त्यावर उच्च स्तरीय बैठक पार पडणार आहे.

स्कॉर्पियन जातीच्या पाणबुडीपेक्षा ५० टक्के मोठी!

या प्रकल्पावर सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामध्ये तिन्ही दलातील प्रमुख आणि संरक्षण मंत्री उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदल हे सहा डिझेल आणि इलेकट्रीक अशा दोन्ही प्रकारे चालणाऱ्या पाणबुड्या प्रोजेक्ट-७५ अंतर्गत बनवणार आहे. त्या सध्या माझगाव डॉक येथे तयार होत असलेल्या स्कॉर्पियन जातीच्या पाणबुड्यांपेक्षा ५० टक्के मोठ्या असणार आहेत. या स्टील्थ जातीच्या पाणबुड्या अवजड क्षेपणास्त्रे वाहू शकतात. समुद्रातून जमिनीवर मारा करणारे आणि समुद्रातून समुद्रावरील युद्धनौकांवर मारा करणारी किमान १२ क्षेपणास्त्रे या पाणबुड्या वाहून नेऊ शकतात. त्याचबरोबर समुद्राखालून मारा करणारी १८ अधिक वजनाची क्षेपणास्त्रेही यात बसू शकतात.

(हेही वाचा : मुख्यमंत्री साहेब वाचाळवीर मंत्र्यांच्या तोंडाला ‘लॉक’ कधी लावणार?)

स्टील्थ जातीच्या पाणबुड्यांचे वैशिष्ट्ये काय? 

  • स्टील्थ म्हणजे गुप्त, लपणे! यावरून या जातीच्या पाणबुड्या सहजासहजी शत्रूच्या रडारवर दिसत नाहीत.
  • या पाणबुड्या समुद्रात अधिक काळ मोहिमेवर राहू शकतात. इंधनसाठी समुद्राच्या वरती लगेच येण्याची गरज भासत नाही.
  • परमाणू क्षमता असल्याने या पाणबुड्यांना समुद्राच्या खाली दीर्घकाळ राहणे शक्य होते.
  • न्यूक्लियर रिऍक्टरमुळे या पाणबुड्यांची विजेची आणि इंधनाची गरज भागून जाते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.