कोकण रेल्वेनं (Konkan Railway) जायचं म्हंटलं की प्रवाशांचे मोठेच हाल होतात. कन्फर्म तिकीट न मिळणं, रेल्वेगाड्या उशिरानं धावणं, जादा रेल्वेगाड्या नसणं, मर्यादित स्थानकांनाच थांबा असणे, अवेळी विशेष रेल्वेगाड्या चालवणे अशा समस्या प्रवाशांना भेडसावतात. मात्र, आता कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला वेग आला असून त्याचा प्राथमिक अहवालही रेल्वे बोर्डाला दिलाय. तो मंजूर झाला की या कामाला वेग येणार असून त्यामुळं जादा गाड्या सोडता येतील, गाड्यांचा वेग वाढेल. (Konkan Railway)
(हेही वाचा –जम्मू-काश्मीर योग आणि ध्यानाची भूमी- PM Narendra Modi)
कोकण रेल्वे सुरु होऊन 31 वर्षे झाली. 1998 पासून तर ती पूर्णपणे सुरु आहे. कोकण,गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या बाजूनं धावणाऱ्या रेल्वेगाड्या तिथलं निसर्गसौंदर्य तुमच्या जवळ आणून ठेवतात. गेल्या दोन दशकात कोकण रेल्वेवरचे प्रवासी वाढले. रेल्वे स्टेशन्स आणि गाड्याही वाढल्या. पण हे सारं एकाच रेल्वे रुळावर सुरु आहे. गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर 740 किलोमीटरचं अंतर फक्त एका ट्रॅकवर सुरु आहे. रोज 75 हून अधिक मालगाड्यांची ये जा या एकाच ट्रॅकवर सुरु असते. परिणामी प्रवासात निष्कारण जादा वेळ जातो. पण आता ही गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडं सुपूर्द केला आहे. (Konkan Railway)
असे असेल दुहेरीकरण
सपाट जमिनीवर रेल्वेच्या प्रतिकिमी दुहेरीकरणासाठी साधारणपणे 15 ते 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर,घाट,बोगद्याच्या ठिकाणी प्रति किमी खर्च 80 ते 100 कोटी रुपये अपेक्षित आहे. रोहा ते वीर दरम्यानचं दुहेरीकरण पूर्ण झालं असून त्यासाठी 530 कोटी रुपये खर्च आला. आता मडगाव ते ठोकुर आणि कणकवली ते सावंतवाडी दरम्यान टप्पा दुहेरीकरण केले जाईल.सध्या कोकण रेल्वेवरून दरदिवशी 55 रेल्वेगाड्या आणि 18 मालगाड्या धावतात. टप्प्या दुहेरीकरण झाल्यास, रेल्वेगाड्या धावण्याची क्षमता दुप्पट होईल. (Konkan Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community