Water Storage : देशातील १५० जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठा; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालाची आकडेवारी समोर

केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात चिंताजनक आकडेवारी पुढे आलीय. अहवालानुसार देशातील १५० मुख्य जलाशयांमध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

135
Water Storage : देशातील १५० जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठा; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालाची आकडेवारी समोर

देशातील कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना घाम सुटला असतानाच पाण्याचे स्रोतही आटले आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या नुकत्याच आलेल्या अहवालात याबाबत आकडेवारी समोर आली आहे. जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील १५० मुख्य जलाशयांमध्ये केवळ २१ टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक आहे. जलविद्युत प्रकल्प आणि पाणीपुरवठ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या, या जलाशयांची एकत्रित साठवण क्षमता १७८.७८४ अब्ज घनमीटर (बीसीएम) आहे, जी देशाच्या एकूण पाणी साठवण क्षमतेच्या ६९.३५ टक्के आहे. या जलाशयांमध्ये गुरुवारपर्यंत उपलब्ध साठा ३७.६६२ बीसीएम होता, जो त्यांच्या एकूण क्षमतेच्या २१ टक्के आहे. एकूणच, १५० जलाशयांमध्ये ५४.३१० बीसीएम एवढा जिवंत साठा उपलब्ध आहे, ज्याची एकूण क्षमता २५७.८१२ बीसीएम आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या आकडेवारीपेक्षा कमी आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात असे म्हटले आहे की, जलाशयांमध्ये सध्याचा साठा गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठ्यापेक्षा कमी आहे. पहिल्या दोन आठवड्यात जलाशयांमधील एकूण जलसाठा सुमारे २२ टक्के होता, तर एक आठवड्यापूर्वी तो २३ टक्के होता. (Water Storage)

आयोगाच्या अहवालानुसार, उत्तर आणि पूर्व भारतातील कडाक्याच्या उष्णतेमुळे दिल्लीसह देशातील अनेक भागात जलसंकट दिसून येत आहे. जलाशयांमधील पाणीसाठा पाहिल्यास दक्षिण भारतातील राज्यांवर त्याचा खोलवर परिणाम झाला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या असलेल्या ४२ जलाशयांची एकूण क्षमता ५३.३३४ बीसीएम आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार या जलाशयांमध्ये उपलब्ध साठा आता ८.५०८ बीसीएम इतका आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २१ टक्के कमी आहे. (Water Storage)

(हेही वाचा – देशातील १५७ विद्यापीठे डिफॉल्टर घोषित; लोकपाल नियुक्ती नसल्यामुळे UGC ची कारवाई)

इतका पाणीसाठा शिल्लक 

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील एकूण १० जलाशयांमध्ये एकूण १९.६६३ बीसीएम पाणी साठवण क्षमता आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार या जलाशयांमध्ये सध्याचा पाणीसाठा (Water Storage) ५.४८८ बीसीएम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३९ टक्क्यांनी कमी आहे. तसेच आसाम, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड आणि बिहारमधील २३ जलाशयांची एकूण साठवण क्षमता २०.४३० बीसीएम आहे. या जलाशयांमध्ये सध्याचा पाणीसाठा ३.८७३ बीसीएम आहे, जो एकूण क्षमतेच्या १९ टक्के आहे. मात्र, या २३ जलाशयातील पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या १८ टक्क्यांच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. (Water Storage)

भारतातील पश्चिमेकडील राज्य, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये एकूण ४९ जलाशय आहेत. त्यांची पाणी साठवण क्षमता १७.१३० बीसीएम आहे. या ४९ जलाशयांमध्ये सध्याचा पाणीसाठा ७.६०८ बीसीएम आहे. हा जलसाठा गेल्या वर्षीच्या २४ टक्क्यांच्या तुलनेत २०.४९ टक्क्यांवर आला आहे. त्याचप्रमाणे, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सध्या असलेल्या २६ जलाशयांची एकूण पाणी साठवण क्षमता ४८.२२७ बीसीएम आहे. सद्यस्थितीबाबत बोलायचे झाल्यास या २६ जलाशयांमध्ये १२.१८५ बीसीएम पाणीसाठा (Water Storage) आहे. गेल्या वर्षीच्या ३२ टक्क्यांच्या तुलनेत हा साठा २५ टक्क्यांवर आला आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार देशातील सर्व जलाशयांच्या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. (Water Storage)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.