5जी वायरलेस नेटवर्क मानवी तसेच अन्य जीवजंतूंवर विपरीत परिणाम करणारे आहे. त्याच बरोबर यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे, असे सांगत अभिनेत्री जुही चावला हिने थेट दिल्ली उच्च न्यायालयातच याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर शुक्रवारी, ४ मे रोजी न्यायालयाने याबाबत आधी सरकारकडे न जाता थेट न्यायालयात का आलात? अशा प्रकारे कायदेशीर अधिकारांचा दुरुपयोग का केला? असे विचारात न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावलीच, शिवाय तिला २० लाखांचा घसघशीत दंडही ठोठावला.
Delhi High Court imposes Rs 20 lakhs cost on actor Juhi Chawla @iam_juhi for filing the "defective and vexatious" civil suit against 5G rollout.
"It appears suit was filed for publicity", Court says.#JuhiChawla #DelhiHC https://t.co/SSL6mYcBYx
— Live Law (@LiveLawIndia) June 4, 2021
प्रसिद्धीसाठी दाखल केली याचिका!
यावेळी न्यायालयाने जुहीला फटकारले. ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. म्हणूनच याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली गेली, असे न्यायमूर्ती जीआर मिधा यांच्या खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी, २ जून रोजी सुनावणीच्या वेळी जुही चावला सरकारला निवेदन न देता 5G वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञानाला आव्हान देण्यासाठी थेट कोर्टात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.
(हेही वाचा : नौदलाकडे ६ अत्याधुनिक पाणबुड्या येणार! किती कोटींचा आहे प्रकल्प? वाचा… )
जुहीची याचिका नेमकी काय?
अॅड. दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत जुही चावला हिने 5जी या वायरलेस नेटवर्कमुळे मानवी जीव तसेच अन्य जीवजंतू किंबहुना पृथ्वीवरील पर्यावरणावर कायमचा परिणाम होणार आहे. त्यामुळे यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली होती. तसेच 5 जी तंत्रज्ञान मानवजातीसाठी, पुरुष, स्त्री, प्रौढ, लहान मुले, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का, हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली होती.
गाणे गाणाऱ्या व्यक्तीविरुद्ध अवमान नोटीस!
सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीला आणि बेकायदेशीरपणे सुनावणीत भाग घेतलेल्या सर्वांना न्यायालयाने अवमान नोटीस बजावली आहे. सुनावणीत अडथळा आणल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना अशा लोकांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community