Police Recruitment : मैदानासाठी मुंबई पोलिसांची वणवण

262
Police Recruitment : मैदानासाठी मुंबई पोलिसांची वणवण

महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया १९ जून पासून सुरू करण्यात आली आहे. परंतु मुंबई पोलिसांना भरती प्रक्रिया राबविण्यासाठी अद्याप मैदान उपलब्ध होत नसल्यामुळे मुंबईतील भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई पोलिसांकडून भरतीसाठी सिंथेटिक मैदानाचा शोध सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Police Recruitment)

लोकसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्र पोलीस दल आणि कारागृह शिपाई भरती २०२२-२३ प्रक्रिया १९ जून पासून सुरू करण्यात आली आहे. १७ हजार ४७१ विविध पदांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज दाखल झालेले आहेत. त्यातून १७ हजार ४७१ उमेदवार निवडले जाणार आहेत. १९ जून पासून विविध जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरती मैदानी चाचणी सुरू करण्यात आली आहे, परंतु मुंबईत अद्याप भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. पावसामुळे मुंबईतील मैदानात चिखल झाल्यामुळे मैदानी चाचणीसाठी मुंबई पोलिसांकडून सिंथेटिक मैदानाचा शोध सुरू आहे. सिंथेटिक मैदानाचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांना वणवण करावे लागत आहे. (Police Recruitment)

(हेही वाचा – Police Recruitment : १७ हजार पदांसाठी १७ लाख ७६ हजार अर्ज, १९ जून पासून मैदानी चाचणी सुरू)

सिंथेटिक पृष्ठभाग मैदानासाठी मुंबई पोलिसांनी प्रस्ताव केला दाखल

पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबई पोलीस दलाचे नायगाव, मरोळ आणि कलीना येथील मैदानावर चिखल झाला असल्यामुळे त्या ठिकाणी मैदानी चाचणी पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराना गैरसोयीचं होईल. त्यामुळे मुंबई पोलीस दलाकडून अद्याप भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. दुसरीकडे लोहमार्ग पोलीस भरती करता मैदानी चाचणी परीक्षा घाटकोपर येथील रेल्वे पोलीस मैदानावर सुरू झाली आहे. (Police Recruitment)

पावसामुळं सिंथेटिक पृष्ठभाग असलेलं मैदान, मैदानी चाचणी परीक्षा घेण्याकरता गरजेचं आहे. मुंबईतील अशा मैदानासाठी मुंबई पोलिसांनी प्रस्ताव दाखल केला असून येत्या काही दिवसांतच मैदान उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलाचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, “आम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी योग्य मैदानाची उपलब्धता लवकरच करुन घेऊ. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील मैदानी चाचणी परीक्षा घेण्यास सुरुवात करणार असल्याची शक्यता आहे.” मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी जवळपास ५ लाख ६९ हजार अर्ज आले असून मुंबई पोलीस दलात ४ हजार २३० पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. ४ हजार २३० पदांपैकी पोलीस शिपाई पदाकरता २ हजार ५७२ चालक पदासाठी ९१७ बँड्समन पदासाठी २४ , तुरुंग शिपाई पदासाठी ७१७ जागा भरल्या जाणार आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Police Recruitment)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.