Mega Block : सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक

151
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे, मुंबई विभाग खालीलप्रमाणे रविवार दि. २३.०६.२०२४ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. (Mega Block)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीमी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. या वेळेतील धीम्या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल. (Mega Block)

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटणारी ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.३२ वाजता सुटणारी आसनगाव लोकल ब्लॉकनंतर पहिली लोकल असेल. (Mega Block)

(हेही वाचा – Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला जामीन मंजूर!)

अप धीम्या मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉक होण्यापूर्वीची शेवटची लोकल ही बदलापूर लोकल कल्याण येथून सकाळी ९.१३ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ही कल्याण लोकल असून ती कल्याण येथून दुपारी २.३३ वाजता सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अप हार्बर मार्ग सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ दरम्यान वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सेवा बंद राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. (Mega Block)

डाऊन हार्बर मार्गावर :

ब्लॉकपूर्वी

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ब्लॉकपूर्वीची सकाळी ११.०४ वाजता पनवेलसाठी शेवटची लोकल असेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२२ वाजता गोरेगावसाठी शेवटची लोकल असेल.
  • ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ०४.५१ वाजता सुटेल.

ब्लॉकनंतर वांद्रे

पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी ०४.५६ वाजता सुटेल. (Mega Block)

अप हार्बर मार्गावर :
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९.४० वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ०३.२८ वाजता सुटेल.
  • गोरेगाव येथून दुपारी ०४.५८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल सुटेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. (Mega Block)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.