बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या सहकार्याने भारतीय लष्कराच्या (Indian Army) मुंबई स्थित मुख्यालय (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात विभाग) अंतर्गत, १५ आसाम रेजिमेंटच्या पाइप बँड पथकाकडून शनिवार (२२ जून) सायंकाळी ६ वाजता किलाचंद चौक (हॉटेल मरीन प्लाझासमोर), मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे सामरिक धून (मार्शल ट्यून) वादन होणार आहे. (Indian Army)
भारतीय लष्कराच्या शिस्त आणि शौर्यासोबतच लष्करी वाद्यवृंदाची ओळख नागरिकांना व्हावी. लष्करी वाद्यसंगीताची अनुभूती नागरिकांना घेता यावी, या उद्देशाने भारतीय लष्कर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पाइप बँड पथकाकडून सामरिक धून वादनाचे कार्यक्रम मुंबई महानगरात विविध ठिकाणी आयोजित केले जात आहेत. यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील सेल्फी पॉईंट, भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) आणि स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे सदर पाइप बँड पथकाने सामरिक धून सादरीकरण केले होते. त्यास मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रतिसाद दिला होता. (Indian Army)
(हेही वाचा – Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी विशाल अग्रवालला जामीन मंजूर!)
नागरिकांकडून मिळणारा हा प्रतिसाद पाहून आता शनिवार २२ जून रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान किलाचंद चौक (हॉटेल मरीन प्लाझासमोर), मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लष्करी वाद्यवृंदाच्या सादरीकरणाची अनुभूती घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Indian Army)
लष्करी पाइप बँडची दैदिप्यमान परंपरा
भारतीय लष्कराच्या (Indian Army) १५ आसाम रेजिमेंटच्या पाइप बँड पथकाची स्थापना दिनांक १५ जुलै १९८७ रोजी मेघालयाची राजधानी शिलाँग येथे झाली. हा पाइप बँड उत्कृष्टता आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो. यापूर्वी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत मिळून या बँडने विविध ठिकाणी सादरीकरण केले आहे. त्यामध्ये मुंबईतील राजभवन, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए), षण्मुखानंद सभागृह, महालक्ष्मी रेसकोर्स आदी ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईकरांनाही या बँडच्या सादरीकरणाची अनुभूती घेता यावी, यासाठी यंदा प्रथमच भारतीय लष्कर आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरात विविध ठिकाणी सादरीकरण केले जात आहे. सुमारे २० सदस्यांचा समावेश असलेल्या पथकाद्वारे गौरवशाली आणि सुमधुर रचना सादर केल्या जातात. यात प्रामुख्याने पाइप आणि ड्रम या दोन वाद्यांचा समावेश असतो. (Indian Army)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community