T20 World Cup, Ind vs Ban : बाद फेरीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा 

T20 World Cup, Ind vs Ban : भारतीय संघ स्पर्धेत अजून अपराजीत आहे

169
T20 World Cup, Ind vs Ban : बाद फेरीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा 
T20 World Cup, Ind vs Ban : बाद फेरीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा 
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय संघासाठी आतापर्यंत टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, Ind vs Ban) सगळं मनासारखं घडलं आहे. म्हणजे सांघिक कामगिरी आणि विजयाचं गणित म्हटलं तर सगळं आलबेल आहे. फक्त रोहित आणि विराट या ज्येष्ठ खेळाडूंनी कामगिरीत सातत्य दाखवलेलं नाही, हीच चिंतेची बाब आहे. आता बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध शनिवारी दोघांसमोर पुन्हा एकदा संधी असेल ती फॉर्म दाखवून देण्याची. आणि स्पर्धेत अपराजीत राहण्याचा लौकिकही संघाला कायम ठेवायचाय. (T20 World Cup, Ind vs Ban)

उलट बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धचा पहिला सामना त्यांनी गमावलाय. फलंदाजीच्या संघाच्या मर्यादाही उघड झाल्या आहेत. सलग दोन पराभव झाले तर त्यांचं आव्हान संपुष्टात येणार आहे. ती काळजी त्यांच्यासमोर असेल. (T20 World Cup, Ind vs Ban)

(हेही वाचा- Anti Paper Leak Act: देशात पेपरफुटीविरोधी नवा कायदा लागू, नियम काय आहेत? जाणून घ्या…)

शनिवारच्या सामन्यासाठी हवामान, संभाव्य संघ याविषयीचे अंदाज पाहूया,

खेळपट्टी –

नॉर्थ साऊंडची (North Sound) खेळपट्टी आतापर्यंत कमी धावसंख्येची ठरली आहे. आधी झालेले सामने तरी गोलंदाजांना धार्जिणे होते. फिरकीपटू आणि तेज गोलंदाज दोघांनाही खेळपट्टीने समसमान मदत केली आहे. त्यामुळे सुरुवातीची षटकं जपून खेळणं ही एकच रणनीती फलंदाजांना राबवावी लागणार आहे. एकदा खेळपट्टीवर स्थिरावल्यावर ते आपले फटके खेळू शकतात. (T20 World Cup, Ind vs Ban)

हवामान –

सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता मात्र खूपच कमी म्हणजे १ टक्के इतकीच आहे. त्यामुळे पूर्ण २० षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो.  (T20 World Cup, Ind vs Ban)

(हेही वाचा- Thane: ठाण्यातील फुटबॉल मैदानावर लोखंडी शेड कोसळली, ८ मुले जखमी; ३ गंभीर अवस्थेत)

भारताचा संभाव्य संघ

पहिल्या सुपर ८ सामन्यात कुलदीप यादवचा संघात समावेश झाला होता. ती खेळी यशस्वी ठरली. त्याचे चेंडू वळत होते. वेगातील बदल फलंदाजांना चकवतही होता. आताही तोच संघ कायम राहील अशी शक्यता आहे. मोहम्मद सिराज बारावा खेळाडू असेल. तर शिवम दुबेला मधल्या फळीत कायम असेल. (T20 World Cup, Ind vs Ban)

रोहित (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, शिवन दुबे, हार्दिक पटेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग व मोहम्मद सिराज (बारावा खेळाडू) (T20 World Cup, Ind vs Ban)

(हेही वाचा- Tom Alter : राजेश खन्नामुळे ‘हा’ झाला अभिनेता; जीवन प्रवास जाणून घ्या)

बांगलादेशचा संभाव्य संघ

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेशची फलंदाजी अपयशी ठरली. पण, त्यामुळे संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

नजमुल शांतो (कर्णधार), तनझीद हसन, लिट्टन दास, शकीब अल हसन, तौहिद ह्रदय, महमदुल्ला, मेहदी हसन, रिषाद हुसेन, तस्कीन हमद, तनझीम शकीब, मुस्तफिझुर रेहमान, जाकिर अली, तन्वीर इस्लाम, शोरिफुल इस्लाम व सौम्या सरकार  (T20 World Cup, Ind vs Ban)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.