Cricket Bowling Machine : फलंदाजीतील नैपुण्यासाठी ५ सर्वोत्तम बोलिंग मशिन्स

Cricket Bowling Machine : क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी बोलिंग मशिन हे महत्त्वाचं उपकरण आहे

122
Cricket Bowling Machine : फलंदाजीतील नैपुण्यासाठी ५ सर्वोत्तम बोलिंग मशिन्स
Cricket Bowling Machine : फलंदाजीतील नैपुण्यासाठी ५ सर्वोत्तम बोलिंग मशिन्स
  • ऋजुता लुकतुके

१.४ अब्ज लोकसंख्येच्या भारत देशात किमान १० कोटी लोकांचं स्वप्न असतं क्रिकेटपटू होण्याचं. नाहीतर घरात कुणालातरी क्रिकेट खेळताना बघायचं. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी त्यासाठी कौशल्य, तंत्र आणि अचूकता लागते. ती साध्य करण्यासाठी यांत्रिक उपकरणांची मदत घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होतो. यंत्र अचूक असतात आणि सातत्याने एकाच गोष्टीचा सराव तुम्हाला देऊ शकतात. पाहिजे तसा सराव तुमच्याकडून करून घेऊ शकतात. (Cricket Bowling Machine)

(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Ban : बाद फेरीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा )

फलंदाजीच्या सरावासाठी उपयोगी पडतात ती बोलिंग मशिन. तेज गोलंदाजी आणि फिरकीतील वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू ही मशिन लीलया टाकतात. आणि सरावाचा स्तरर त्यामुळे उंचावतो. गंमत म्हणजे अगदी १,००० रुपयांपासून ही मशिन उपलब्ध आहेत. १,००० रुपयांचं मशिन आहे त्याला थ्रोअर म्हणतात. एकाच प्रकारचा चेंडू तुम्हाला यात सेट करता येतो. बाकी मशिन्सचीही माहिती करून घेऊया. (Cricket Bowling Machine)

मशीन

अंदाजे किंमत (रुपयांमध्ये)

फीड बडी ऑटोमॅटिक प्लास्टिक फीड मशिन

१०,०००

फ्रँकलीन स्पोर्ट्स एमएलबी पिचिंग मशीन

९,५००

आर६६टी अकॅडमी बॉल फीडर

१०,५००

द रोबोआर्म ॲडव्हान्स्ड बॉल थ्रोअर

१,०००

एस अँड एफ जन्क्शन थ्रोअर

९,५०

फ्लायर फ्लाय प्रोफेशनल मशीन

१२,५००

लिव्हरेज अमेझिंग आयविनर

३४,५००

(हेही वाचा- Amrish Puri यांचा जीवन प्रवास कसा होता ? वाचा सविस्तर..)

बॉल थ्रोइंग मशीन ही इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अशी दोन प्रकारची असतात. मेकॅनिकल यंत्रांना चेंडू दरवेळी फीड करावा लागतो. त्यात एक अतिरिक्त माणूस अडगवला जातो. शिवाय हा सराव वेळखाऊही असतो. हे यंत्र घेताना त्यात चेंडूचा वेग आणि चेंडू फेकीत विविधता ठेवता येते ना, हे तपासून पाहा. तसंच ती दुमडता येणारी असतील तर जागाही कमी व्यापतील. अशी यंत्र उपलब्ध आहेत. शिवाय एक यंत्र किती काळ टिकेल आणि विजेवर चालणारं असेल तर वीज जोडणी कशी करणार याचा आधीच विचार करून ठेवा. (Cricket Bowling Machine)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.