भाजपाची रणनिती ठरली, विधानसभेआधी मोठे बदल होणार? Chandrasekhar Bawankule म्हणाले…

213
भाजपाची रणनिती ठरली, विधानसभेआधी मोठे बदल होणार? Chandrasekhar Bawankule म्हणाले...
भाजपाची रणनिती ठरली, विधानसभेआधी मोठे बदल होणार? Chandrasekhar Bawankule म्हणाले...

राज्यासह देशभरात लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकची रणधुमाळी संपली आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद (Legislative Assembly) आणि विधानसभेच्या लोकसभा (Legislative Assembly Lok Sabha) निवडणुकीकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान भाजपाला लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. शुक्रवारी सायंकाळी मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. ही बैठक रात्री ८ ते १ वाजेपर्यंत चालली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), आमदार आशिष शेलार, विनोद तावडे, माजी खासदार रावसाहेब दानवे उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवर तसेच आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. (Chandrasekhar Bawankule)

(हेही वाचा – Thane: ठाण्यातील फुटबॉल मैदानावर लोखंडी शेड कोसळली, ८ मुले जखमी; ३ गंभीर अवस्थेत)

या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी बैठकीत नेमक्या कोणकोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली याबाबत सविस्तर माहिती दिली. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “बैठकीत आमची विधानपरिषद आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. विधानपरिषद निवडणुकीसाठी कोअर कमिटीकडून १० नावं निश्चित करुन ती यादी दिल्लीत पाठवली जाणार आहे”. (Chandrasekhar Bawankule)

“आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याचे गणित लक्षात घेऊनच आम्ही विधानसपरिषदेसाठी उमेदवार निश्चित करणार आहोत. यासाठी उमेदवारांचा विधानसभा क्षेत्रात किती प्रभाव आहे. तसेच त्यांना संधी दिल्यास विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरणे कशा पद्धतीने बदलतील”, हे मुद्दे विचारण्यात घेण्यात आल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

(हेही वाचा – Amrish Puri यांचा जीवन प्रवास कसा होता ? वाचा सविस्तर..)

लोकसभेत ज्या ठिकाणी आमची ताकद कमी पडली, त्याठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, असं बावनकुळे म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून एक ब्लू प्रिंट (BJP Blue Print) तयार केली जाणार असून याआधारे उमेदवारांची निवड, प्रचार आणि रणनीती या गोष्टी निश्चित होतील. यासंदर्भात कोअर कमिटीची आणखी एक बैठक पार पडेल. त्यात ही ब्लू प्रिंट निश्चित केली जाईल, असंही बावनकुळे म्हणाले.

१० नावांची यादी पाठवणार

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपाचा मोठा पराभव झाला आहे. २३ जागेवरुन भाजपाला फक्त ९ जागाच मिळाल्या आहेत. दरम्यान, आता ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. काल भाजपाची सलग पाच तास बैठक चालली आहे. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीची चर्चा झाली असून दहा नावांची यादी केंद्राकडे पाठवली जाणार आहे. असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  (Chandrasekhar Bawankule)

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.