विकेंड असल्याने पर्यटनासाठी लोणावळ्याकडे येणाऱ्या मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत या रांगा लागल्या आहेत. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिस प्रशासनाकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शनिवार आणि रविवार सलग सुट्ट्या आल्याने अनेक पर्यटक पर्यटनासाठी लोणावळ्यामध्ये दाखल होत आहेत. (Mumbai-Pune Expressway)
(हेही वाचा –Nitesh Rane: ‘हिंदुधर्म रक्षक…’, नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’बाहेर झळकले बॅनर!)
रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली, तसेच अवजड वाहने देखील वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. ही वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना तासंतास वाट पहावी लागत आहे. मुंबईहून पुण्याकडे अनेक नागरिक ये-जा करत असतात. त्यात शनिवार -रविवार सुट्टी आल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक घराच्या बाहेर पडले आहेत. (Mumbai-Pune Expressway)
(हेही वाचा –Crime News: बिल्डरच्या टोळ्यांनी रस्त्यावर केला अंदाधुंद गोळीबार, २ बुलडोझर जाळले)
सकाळच्या सुमारास अनेक वाहने लोणावळ्याकडे निघाले असताना ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्याने मावळ तालुक्यातील पर्यटन खुलू लागले आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यभरातून पर्यटक मावळ तालुक्यातील लोणावळ्यामध्ये पर्यटनासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. (Mumbai-Pune Expressway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community