मुंबईचे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन (MEGA) फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत सुमारे २०० बहावा वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. (Tree Plantation)
येत्या सोमवारी २४ जून २०२४ रोजी २०० बहावा वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते सोमवारी सकाळी ९ वाजता हे वृक्षारोपण पार पडणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अभिनेता अक्षय कुमार हे त्यांचे दिवंगत वडील हरी ओम भाटिया आणि आई अरुणा भाटिया यांना श्रद्धांजली वाहणार आहेत. उप आयुक्त (परिमंडळ ३) (अतिरिक्त कार्यभार) विश्वास मोटे आणि मेगा फाउंडेशनच्या डॉ. अनुषा श्रीनिवासन अय्यर आदींसह महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. (Tree Plantation)
(हेही वाचा – वीकेंडला बाहेर जाताय तर थांबा! Mumbai-Pune Expressway वर वाहनांच्या लांबच लांब रांगा)
ही वृक्षारोपण मोहीम मुंबईला हरित ठेवण्यासाठी राबविण्यात येत आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर अनेक वृक्षांची पडझड झाली. त्यातून झालेले पर्यावरणाचे नुकसान भरून काढण्यासाठी ‘झाडांचा खड्डा स्वीकारा आणि निसर्गाचे पालक बना’ या मोहिमेत आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, बप्पी लाहिरी, अजय देवगण आणि त्यांचा मुलगा युग देवगण, सोनू निगम, संग्राम सिंह, रणवीर शौरी आणि त्यांचा मुलगा हारून शौरी, रोहित शेट्टी तसेच ज्येष्ठ अभिनेत्री तथा खासदार हेमा मालिनी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, आयेशा झुल्का आदींनी सहभाग नोंदविला आहे. (Tree Plantation)
उपायुक्त विश्वास मोटे हे के/पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना त्यांनी झाडांची पडझड झाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा झाड लावले जावे यासाठी ते आग्रही होते आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी पडलेल्या झाडाचा खड्डा स्वीकारा अशा प्रकारचा उपक्रम हाती घेतला आणि त्या पडलेल्या झाडाच्या ठिकाणी पुन्हा झाडे लावण्यास सुरुवात केली होती. आता उपायुक्त बनल्यानंतर त्यांनी हा उपक्रम पुन्हा राबविण्यास सुरुवात केली आहे. (Tree Plantation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community