Blood Test Camp: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्त तपासणी शिबिर संपन्न!

रक्त तपासणीदरम्यान कोणती काळजी घ्यावी, याविषयीही तपासणीवेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी माहिती दिली.

138
Blood Test Camp: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्त तपासणी शिबिर संपन्न!
Blood Test Camp: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्त तपासणी शिबिर संपन्न!

आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. रक्त तपासणीमुळे अनेक आजारांचे निदान वेळेवर करणे शक्य होते. याकरिता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे (International Yoga Day) औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि ॐ दादर योग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, (२२ जून) रोजी सकाळी ७:३० ते १०:३० या वेळेत रक्त तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. (Blood Test Camp)

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रांगणात शंभराहून अधिक तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिकांनी रक्त तपासणी केली. सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या आरोग्याच्या चिकित्सेसाठी रक्त तपासणीचे आयोजन केले होते. यासाठी दादर येथील डॉ. अविनाश फडके (Dr. Avinash Phadke) यांची अत्याधुनिक अॅगिलस (Agilus) (Agilus Diagnostics) रक्त तपसणी प्रयोगशाळा अंतर्गत CBC, TSH, VITB12, VITD3, CALCIUM, CREATININE, HBA1C, LIPID, SGOT, SGPT या चाचण्या १३०० रुपये शुल्क आकारून सवलतीच्या दरात रक्त तपासणी करण्यात आले. (Blood Test Camp)

(हेही वाचा – वीकेंडला बाहेर जाताय तर थांबा! Mumbai-Pune Expressway वर वाहनांच्या लांबच लांब रांगा)

गेल्या १० वर्षांपासून रक्त तपासणीचे आयोजन

जागतिक योग दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि ॐ दादर योग सेंटर (Om Dadar Yoga Center) यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १० वर्षांपासून रक्त तपासणीचे आयोजन करण्यात येते. यंदा रक्त तपासणीसाठी तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला होता, अशी माहिती योग शिक्षक श्रीपाद काळे यांनी दिली.

(हेही वाचा – Nitesh Rane: ‘हिंदुधर्म रक्षक…’, नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’बाहेर झळकले बॅनर!)

रक्त तपासणीदरम्यान कोणती काळजी घ्याल?

रक्त तपासणीदरम्यान ३ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये रुग्णांनी काळजी घेतली पाहिजे. या संदर्भात रुग्णांनी रक्त तपसण्याअगोदर आदल्या रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत कोणतेही अन्न सेवन करू नये. रक्त तपासणी केलेल्या हातावर जास्त जोर देऊ नये तसेच रक्त तपासणी केलेल्या हाताने कोणतेही जड सामान उचलू नये. वयोमानानुसार वर्षातून एक वेळा सामान्य रक्त चाचणी करणं आवश्यक आहे. यामध्ये सीबीसी, हिमोग्लोबिन, शुगर, कॅल्शियम, किडनी-लिव्हर फंक्शन टेस्ट करून घेणं महत्त्वाचं आहे, अशी माहिती डॉ. साहिल लंगडे (Dr. Sahil Langde) यांनी दिली. (Blood Test Camp)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.