OBC Reservation ला धक्का लागता कामा नये – रामदास आठवले

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

177
OBC Reservation ला धक्का लागता कामा नये - रामदास आठवले

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सुरुवातीपासून पाठिंबा असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (२२ जून) जाहीर केले. (OBC Reservation)

एस.सी., एस.टी., ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्यावे ही रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीपासुनची भूमिका आहे. राज्य सरकारने ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची दखल घेऊन उपोषण सोडवावे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली आहे. (OBC Reservation)

(हेही वाचा – Lok Sabha Vice President : लोकसभा उपाध्यक्ष पदावरून महाभारत होण्याची शक्यता)

ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजातील नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि मराठा समाजालाही योग्य ते आरक्षण मिळेल. राज्य शासनाने खात्री देऊन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे उपोषण थांबवले पाहिजे. असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले. (OBC Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.