Slaughterhouse : आधी वक्फ बोर्डाला १० कोटी, आता नागपुरात कत्तलखान्याला मंजुरी

233
राज्य सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर या निर्णयाचे राज्यभर पडसाद उमटले. सरकार मुसलमानांची मर्जी जपण्यासाठी असे निर्णय घेत आहे का, असा आरोप होऊ लागला. हा वाद शमत नाही तोच आता नागपुरात कत्तलखान्याला (Slaughterhouse) शासनाने मंजुरी दिल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे राज्य सरकारला नेमके करायचे काय, असा सवाल निर्माण झाला आहे.

हिंदू समाजात संताप 

राज्य सरकारने जेव्हा वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी दिला, त्यामुळे आधीच हिंदू समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जो वक्फ बोर्ड त्यांच्याकडे असलेल्या अमर्याद अधिकाराच्या जोरावर हिंदूंच्या जमिनी  बळकावत आहे. ते वक्फ बोर्डच आता खालसा करावे, अशी मागणी जोर धरत असताना सरकारने वक्फ बोर्डला १० कोटी रुपये देऊन या बोर्डाची ताकद वाढवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे का, असा सवाल विचारला जात आहे. अभिनेत्री केतकी चितळे हिने यावर सोशल मीडियावर तीव्र संताप वक्त करणारा व्हिडीओ पोस्ट केल्यावर या विषयावर आणखी प्रतिक्रिया येऊ लागल्या.
nagpur
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नाराज हिंदू समाज पुन्हा एकदा संतापला आहे. कारण सरकारने नागपुरातील उमरेड येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने कत्तलखान्याला (Slaughterhouse) मंजुरी दिली आहे. तहसील कार्यालयाने याविषयी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ७ जून रोजी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये प्राधिकरणाने ज्यांना या कत्तलखान्याला (Slaughterhouse) आक्षेप नोंदवायचा असेल त्यांनी पुढील १५ दिवसांत त्यांचे आक्षेप नोंदवावेत असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.