Konkan Rain Alert: कोकणात जोरदार पावसाची हजेरी; एनडीआरएफची टीम तैनात!

203
Konkan Rain Alert: कोकणात जोरदार पावसाची हजेरी; एनडीआरएफची टीम तैनात!
Konkan Rain Alert: कोकणात जोरदार पावसाची हजेरी; एनडीआरएफची टीम तैनात!

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस विजांच्या कडाकडाटासह पावसाची (Konkan Rain Alert) हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. (Konkan Rain Alert)

हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार झाला आहे. पेरणी केलेली शेती बहरली आहे. कोरडे पडलेल्या नदी-नाल्यांना पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. गेले तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरीसह कोकणात पुढील दोन दिवस आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. (Konkan Rain Alert)

जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली

खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीचं पाणी इशारा पातळीच्या वर पोहोचले असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. खेड शहरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वरुन वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहण्यास खेड शहराच्या अगदी बाजूने वाहणारी ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांनी नदीकाठी विनाकारण फिरू नये, असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Konkan Rain Alert)

दुसरीकडे खेड शहरात सखल भागात पाणी साचले असून शिवतर मार्गावर अरुंद गटारांमुळे पाणी रस्त्यावरती येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड दापोली भागात कालपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे या भागातील नद्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. (Konkan Rain Alert)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.