Vehicle Choice Number : वाहनांचा चॉइस क्रमांक आता ऑनलाइन

163
Vehicle Choice Number : वाहनांचा चॉइस क्रमांक आता ऑनलाइन

राज्याच्या परिवहन विभागाने सुमारे ६० सेवा फेसलेस केल्यानंतर आता प्रथमच वाहनांचा चॉइस क्रमांक (VIP No) देखील ऑनलाइन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात प्रायोगिक तत्त्वावर निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ‘एनआयसी’ने संगणकीय प्रणालीत आवश्यक बदल केला आहे, त्यामुळे सोमवारपासून पिंपरी-चिंचवड कार्यालयात चॉइस क्रमांक ऑनलाइन उपलब्ध होईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यभर अंमलबजावणी केली जाणार आहे. (Vehicle Choice Number)

आपल्या वाहनाला आकर्षक क्रमांक मिळावा म्हणून अनेकजण लाखो रुपये खर्च करतात. याचा फायदा आरटीओ प्रशासनाला होत असला; तरी अनेकदा दलालांकडूनही वाहनचालकांची लूट केली जाते. वाहनाच्या मालिकेत एक ते ९९९९ क्रमांक असतात. यात सुमारे ३०० क्रमांक आकर्षक असतात, त्यांचे दर जास्त आहेत. शिवाय काहीजण आपल्या वाढदिवसाची तारीख अथवा वर्ष किंवा त्यांना हवा असणाऱ्या क्रमांकाची मागणी करतात. (Vehicle Choice Number)

(हेही वाचा – Slaughterhouse : आधी वक्फ बोर्डाला १० कोटी, आता नागपुरात कत्तलखान्याला मंजुरी)

तो आकर्षक जरी नसला; तरीही चॉइस क्रमांक म्हणून गणला जातो. त्यामुळे वाहनाच्या वर्गवारीनुसार त्याचे दर आकारले जातात. हे करत असताना गैरप्रकार घडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे राज्याच्या परिवहन विभागाने पहिल्यांदाच चॉइस क्रमांकांची विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रक्रियेत आता पारदर्शता येणार आहे. शिवाय वाहनचालकांना आरटीओ कार्यालयाचे खेटे मारावे लागणार नाहीत. (Vehicle Choice Number)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.