Box Cricket : बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या १० महत्त्वाच्या गोष्टी

Box Cricket : शहरी भागात मैदानं कमी असल्यामुळे बॉक्स क्रिकेट जास्त लोकप्रिय आहे.

132
Bizarre Cricket Rule : ‘या’ स्पर्धेत षटकार ठोकण्यालाच आहे बंदी
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट (Cricket) हा भारतातील लोकप्रिय खेळ आहे. पण, शहरी भागांत मैदानांसाठी जागा कुठे आहे. त्यामुळे मग गल्ली क्रिकेट आणि एक टप्पा क्रिकेट असे प्रकार निघाले. तसाच एक शहरी भागात झपाट्याने लोकप्रिय होत असलेला प्रकार आहे बॉक्स क्रिकेट. एका ठरावीक छोट्या आकाराच्या तो खेळला जातो, म्हणून नाव पडलं बॉक्स क्रिकेट. मैदानाचा आकार चौकोनी किंवा उपलब्धतेनुसार आयताकृतीही असू शकतो. मूळ क्रिकेटमधील धावांची संकल्पना इथंही तशीच आहे. पण, कमी आकाराचं मैदान असल्यामुळे काही नियम बदलले आहेत. इथं घेतलेली प्रत्येक धाव तुम्हाला गुण बहाल करते. शहरांमध्ये बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धाही आता सुरू झाल्या आहेत. (Box Cricket)

(हेही वाचा – Slaughterhouse : आधी वक्फ बोर्डाला १० कोटी, आता नागपुरात कत्तलखान्याला मंजुरी)

आता बॉक्स क्रिकेटसाठी लागणारी उपकरणं बघूया,

बॅट – इथंही फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात द्वंद्व रंगतं. त्यामुळे फलंदाजाकडे बॅट असणं आवश्यक आहे. पण, ती अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचीच असली पहिजे असं नाही. लाकडाची कुठलीही बॅट चालेल.

चेंडू – मैदान लहान आकाराचं असल्यामुळे क्षेत्ररक्षक जवळ उभे असतात. त्यामुळे चेंडू सिझन बॉल वापरता येत नाही. तो टेनिस बॉल आणि तो ही सॉफ्ट असावा. इतर हेलमेट, ग्लव्हज ही साधनं लागत नाहीत.

यष्टी – बॉक्स क्रिकेटलाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणे तीन यष्टी असतात. आणि त्यांचं संरक्षण फलंदाजाने करायचं असतं.

बेल – दोन यष्यांच्यावर असते ती बेल. ती उडवली तरी फलंदाज बाद असतो. किंवा क्षेत्ररक्षकाने बेल उडवली आणि फलंदाज क्रीझमध्ये नसेल तर तो बाद दिला जातो.

मैदान – क्रिकेट पेक्षा लहान मैदान असल्यामुळे बॉक्स क्रिकेट इनडोअरही खेळता येतं. आणि अनेकदा इनडोअरच खेळवलं जातं. अशावेळी इनडोअर मैदानाची गरज आहे. आणि खेळपट्टी ही १८ ते २२ यार्डांची असते.

सिंथेटिक खेळपट्टी – काही वेळा बॉक्स क्रिकेटसाठी सिंथेटिक खेळपट्टीची गरज पडते. (Box Cricket)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.