- ऋजुता लुकतुके
डॅनिश फुटबॉल संघाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. फुटबॉल संघातील एकोप्याचं दर्शन घडवत पुरुषांच्या राष्ट्रीय संघाने चक्क वेतनवाढ नाकारली आहे. महिला आणि पुरुषांच्या वेतनात समानता यावी यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे. खेळाडूंच्या असोसिएशनने शुक्रवारी रात्री प्रसिद्धी पत्रक काढून आपली भूमिका जाहीर केली आहे. ‘महिलांच्या फुटबॉलमधील सुविधा आणि वेतनही वाढावं यासाठी पुरुषांच्या संघाने लिंग समानतेच्या दृष्टीने वेतन वाढ नाकारली आहे,’ असं असोसिएशनचे मॅग्नस हेविड यांनी एएफपी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे. (Denmark National Football Team)
A new four-year agreement has been reached with the Danish Football Association that will see both male and female national team players receive the same fee for representing their country. https://t.co/bl8enfSEZK #Equality
— Linda (@LindaPeters64) June 20, 2024
(हेही वाचा – Box Cricket : बॉक्स क्रिकेट खेळण्यासाठी लागणाऱ्या १० महत्त्वाच्या गोष्टी)
खेळाडूंनी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नवीन करारावर स्वाक्षरी केली आहे. महिलांना आता पुरुषांप्रमाणेच पगार आणि विमा संरक्षण मिळावं अशी अपेक्षा खेळाडूंनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीची वेतन समानता आली असली तरी काही बाबतीत अजूनही समानता साध्य झालेली नाही. (Denmark National Football Team)
महिला व पुरुष खेळाडूंना आता परदेश दौऱ्यावर समान बोनस मिळणार आहे. पण, देशांतर्गत सामन्यांमध्ये महिलांना अजून बोनस मिळत नाही. त्यावरही उन्हाळ्याच्या मोसमात नव्याने चर्चा अपेक्षित आहे. महिला राष्ट्रीय संघाबरोबरचा करार नव्याने झाला की, लिंग समानतेच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलणारा डेन्मार्क फुटबॉल संघ हा पहिला संघ असेल. डेन्मार्क संघ सध्या युरो २०२४ मध्ये सहभागी झाला आहे. सी गटात इंग्लंड, स्लोवानिया विरुद्धचे सामने बरोबरीत सुटल्यामुळे ते गटात दुसऱ्या स्थानावर आहेत. (Denmark National Football Team)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community