- ऋजुता लुकतुके
टोमॅटोचे दर स्थानिक बाजारात सध्या अचानक वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी खुश असला तरी सामान्य ग्राहकांना मात्र भुर्दंड बसला आहे. टोमॅटोच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. देशातील अनेक भागात टोमॅटोचे दर ५० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. तर अशी काही राज्ये आहेत की, जिथे टोमॅटोचे दर हे ७० रुपये किलोपेक्षा जास्त आहेत. (India Tomato Prices)
देशातील १७ राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव ५० रुपयांच्या वर गेला आहे. तर अशी ९ राज्ये आहेत की जिथं टोमॅटोचा दर हा ६० रुपये किलोपेक्षा जास्त आहे. तर ४ राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव ७० रुपयांपेक्षा जास्त आहे. एकच राज्य असे आहे की जिथे टोमॅटोचे भाव १०० रुपयांच्या पुढे गेला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेची लाट आणि टोमॅटोचे घटलेले उत्पादन यामुळं टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या किमती १०० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. (India Tomato Prices)
(हेही वाचा – Tata Steel Strike : टाटा स्टीलचे इंग्लंडमधील कर्मचारी पुढील महिन्यापासून संपावर)
दक्षिण भारतात टोमॅटोची भाववाढ अधिक
देशातील केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबारमध्ये टोमॅटोचे भाव १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, २० जून रोजी येथे टोमॅटोचा भाव १००.३३ रुपये प्रति किलो होता. यानंतर केरळमध्ये टोमॅटोचा भाव हा ८२ रुपये किलो होता. मिझोराम आणि तामिळनाडूमध्ये टोमॅटोचा भाव ७० रुपये किलोच्या पुढे गेला आहे. तेलंगणा, गोवा, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात टोमॅटो ६० रुपयांपेक्षा जास्त किलोने विकला जात आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, सिक्कीम, ओडिशा, दादरा आणि नगर हवेली, मेघालय, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये टोमॅटोचा भाव ५० रुपयांच्या वर पोहोचला आहे. (India Tomato Prices)
दरम्यान, ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार टोमॅटोच्या सरासरी दरात चांगली वाढ झाली आहे. जून महिन्यात टोमॅटोच्या दरात प्रतिकिलो सरासरी १२.४६ रुपयांनी वाढ झाली आहे. ३१ मे रोजी टोमॅटोचा सरासरी भाव ३४.१५ रुपये प्रतिकिलो आहे. २० जून रोजी टोमॅटोचा देशातील सरासरी भाव ४६.६१ रुपये प्रतिकिलो झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या दक्षिण भारतात टोमॅटोची भाववाढ अधिक दिसून येत आहे. उत्तर भारताचा विचार केला तर दिल्लीत टोमॅटोची किंमत ३३ रुपये आहे. जून महिन्यात दिल्लीत टोमॅटोच्या दरात किलोमागे २८ रुपयांची वाढ झाली आहे. (India Tomato Prices)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community