राजस्थानात धर्मांध मुसलमानांकडून Riots; दुकाने जाळली; पोलिसांवर हल्ला केला

दोन दिवसांपूर्वी ईदगाहच्या मागील भिंतीचे दोन दरवाजे काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कॉलनीत राहणाऱ्या काही लोकांनी याला विरोध केल्याचे पोलिसांनी सांगितले. काम सुरू झाल्यानंतरही दोनवेळा हिंदू-मुस्लिम वाद झाला.

212

राजस्थानमधील जोधपूरमधील सूरसागर पोलीस स्टेशन परिसरात हिंसाचार झाला, त्यानंतर तेथे कलम 144 लागू करावे लागले. ईदगाहचे गेट हटवण्यावरून हा वाद सुरू झाला. मात्र यानंतर जाळपोळ आणि दगडफेक (Riots) सुरू झाली. या प्रकरणाला हिंसक वळण लागल्याने दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्ला केला. दुकान व ट्रॅक्टर पेटवून दिले. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ला झाला. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करून परिस्थिती हाताळावी लागली.

शुक्रवारी, 21 जून 2024 रोजी रात्री 10 वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी 40 आरोपींना ताब्यात घेतले आहे. दगडफेकीत चौपासानी हाऊसिंग बोर्ड पोलिस स्टेशनचे एसएचओ नितीन दवे हेही जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देता यावे, यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच अनेक पोलिस ठाण्यांचे पोलिस येथे तैनात करण्यात आले होते. प्रतापनगर सर्कल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

(हेही वाचा Slaughterhouse : आधी वक्फ बोर्डाला १० कोटी, आता नागपुरात कत्तलखान्याला मंजुरी)

दोन दिवसांपूर्वी ईदगाहच्या मागील भिंतीचे दोन दरवाजे काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कॉलनीत राहणाऱ्या काही लोकांनी याला विरोध केल्याचे पोलिसांनी सांगितले. काम सुरू झाल्यानंतरही दोनवेळा हिंदू-मुस्लिम वाद झाला, मात्र पोलिसांच्या पुढाकारामुळे प्रकरण शांत झाले. पुन्हा कॉलनीतील लोक गेट हटविण्याचे काम थांबविण्यावर ठाम झाले. यानंतर हिंदू पक्षही तेथे पोहोचला आणि बाचाबाची सुरू झाली, ज्याचे नंतर हिंसाचारात (Riots) रूपांतर झाले.

आरोपींना ताब्यात घेताना पोलिसांनाही विरोध झाला. पोलिसांनी लोकांना सध्या घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. या हिंसाचारात (Riots) एका जीपचेही नुकसान झाले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करावा लागला. दोन्ही बाजूंनी एकच एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सूरसागरचे आमदार देवेंद्र जोशी आणि शहराचे आमदार अतुल भन्साळी यांनी घटनास्थळी भेट देऊन मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना परिस्थितीची माहिती दिली. इदगाहच्या गेटवरून अल्पवयीन मुलांमध्ये भांडण इतके वाढले की परिस्थिती इथपर्यंत पोहोचली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.