T20 World Cup, Ind vs Ban : बांगलादेशचा ५० धावांनी पराभव करत भारताचं विजयाच्या दिशेनं मजबूत पाऊल

T20 World Cup, Ind vs Ban : फलंदाजी आणि गोलंदाजीतही भारतीय संघाचंच वर्चस्व होतं 

353
T20 World Cup, Ind vs Ban : बांगलादेशचा ५० धावांनी पराभव करत भारताचं विजयाच्या दिशेनं मजबूत पाऊल
T20 World Cup, Ind vs Ban : बांगलादेशचा ५० धावांनी पराभव करत भारताचं विजयाच्या दिशेनं मजबूत पाऊल
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि बांगलादेशमधील (T20 World Cup, Ind vs Ban) सुपर ८ चा सामना हा दोन देशांमधील फिरकीपटूंची लढाई मानली जात होती. भारताकडे अक्षर (Akshar), जडेजा (Jadeja) आणि कुलदीप हे त्रिकुट होतं. तर बांगलादेशकडेही शकीब, तनझीम, रिशाद आणि महमदुल्ला असे चार फिरकीपटू होते. मैदानात जेव्हा हे द्वंद्व रंगलं तेव्हा पहिल्या टप्प्यात भारतीय फलंदाज जिंकले. दुसऱ्या टप्प्यात भारतीय गोलंदाज. (T20 World Cup, Ind vs Ban)

(हेही वाचा- India Tomato Prices : टोमॅटो पुन्हा गेला पन्नाशी पार, दर कशामुळे वाढले?)

बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला पहिली फलंदाजी दिली खरी. पण, सलामीवीर रोहित (Rohit) (२३) आणि विराट (Virat) (३७) यांनी या सामन्यात चांगली सुरुवात केली. त्यानंतर पंतने ३६ तर शिवम दुबेनं (Shivam Dubey) ३४ धावा करत भारताची आगेकूच सुरूच ठेवली होती. तर हार्दिकने २८ चेंडूंत नाबाद ५०० धावा करत भारताला दोनशेच्या अगदी जवळ नेलं. भारताने निर्घारित २० षटकांत ५ बाद १९६ धावा केल्या. बांगलादेशच्या फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर षटकामागे किमान १२ धावा निघाल्या. त्यानंतर भारताची गोलंदाजी सुरू झाली तेव्हा कुलदीपने या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी कशी करायची हे दाखवून दिलं आणि १९ धावांत ३ बळी मिळवले. त्यामुळे बांगलादेशचा संघ २० षटकांत ८ बाद १४६ धावाच करू शकला. भारताला ५० धावांनी विजय मिळाला.  (T20 World Cup, Ind vs Ban)

बांगलादेशनसाठी १९७ धावांचं आव्हान तसं कठीणच होतं. तनझीम हसन (tanzim hasan) (२९) आणि नझमुल शांतो (Najmul Shanto) (४०) यांनी निदान थोडीफार लढत दिली. त्यामुळे बांगलादेशनेही १३ व्या षटकांत शतक फलकावर लावलं होतं. पण, आवश्यक धावगती जास्तच होती. त्यामुळे फलंदाजांवर दडपण होतं. त्यातच जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) आणि कुलदीपला (Kuldeep) गोलंदाजीला आल्यावर मधल्या फळीची कोंडी झाली. कुलदीपने आधी जम बसलेल्या तनझीदला २९ वर बाद केलं. आणि पुढच्याच षटकांत तौहिदलाही बाद केलं. तर बुमरानेही (Jasprit Bumrah) फॉर्ममध्ये असलेल्या नजमुलला ४० धावांवर बाद केलं. कुलदीपने १९ धावांत ३ तर जसप्रीतने १३ धावांत २ बळी मिळवले. अर्धशतकाबरोबरच १ बळी मिळवणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आता भारताची पुढील सामना सोमवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. (T20 World Cup, Ind vs Ban)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.