Pune Accident : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडले; दुचाकीस्वार जागीच ठार

Pune Accident शनिवारी रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास मंचरजवळच्या एकलहरे गावाजवळ घडला. प्रथमिक माहितीनुसार मयुर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होता.

212
Chhatrapati Sambhaji Nagar: धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar: धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर शनिवार, २२ जून रोजी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील (Dilip Mohite-Patil) यांच्या पुतण्याच्या कारने एका दुचाकीस्वाराला चिरडले. (Pune Accident) दिलीप मोहिते-पाटील यांचा पुतण्या मयुर मोहितेच्या फॉर्च्युनर कारने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले. या अपघातामध्ये दुचाकीस्वार 19 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर प्रकरणामध्ये एका भरधाव वेगातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा मयुर मोहिते हा पुतण्या आहे. तोच कार चालवत होता, असे समोर येत आहे. या अपघातात मरण पावलेल्या 19 वर्षीय युवकाचे नाव ओम भालेराव आहे.

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Ban : बांगलादेशचा ५० धावांनी पराभव करत भारताचं बाद फेरीच्या दिशेनं मजबूत पाऊल )

हा अपघात शनिवारी रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास मंचरजवळच्या एकलहरे गावाजवळ घडला. प्रथमिक माहितीनुसार मयुर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होता. मयुर मोहितेच्या कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार काही फूट अंतरावर फेकला गेला. अपघातानंतर जखमी व्यक्तीला मदत करण्याऐवजी मयुर मोहिते (Mayur Mohite) कारमध्येच बसून असल्याचेही समोर आले आहे.

5 ते 10 फूट दूर फेकला मृत व्यक्ती

मयुर मोहिते हा त्याच्या फॉर्च्युनर कारने नारायणगाववरून मंचरच्या दिशेने जात होता. या अपघातात मरण पावलेला 19 वर्षीय ओम भालेराव हा मंचरकडून कळंबच्या दिशेने चालला होता. ओम हा मुळचा कळंबचा असल्याने त्याच्या मृत्यूची बातमी कळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनजवळ गर्दी केली. ओमच्या गावचे नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर मृत व्यक्ती 5 ते 10 फूट दूर फेकली गेली. या ठिकाणी आता सीसीटीव्ही उपलब्ध आहे का, याची पोलीस चाचपणी करत आहे.

गावकरी संतप्त

दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्युनंतर त्याच्या नातेवाईकांची पोलीस स्टेशनला धाव घेतली. दुचाकीस्वार तरुणाच्या मृत्युस कारणीभुत ठरलेल्या मयुर मोहितेविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबजवळच हा भीषण अपघात झाल्याने स्थानिक गावकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने गोळा झाले होते. मंचर पोलीस स्टेशनबाहेरही रात्री मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती. या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. (Pune Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.