गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis

133
गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis
गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis

गडचिरोलीतील (Gadchiroli) जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा म्होरक्या समजल्या जाणाऱ्या गिरधरने पत्नीसह (Devendra Fadnavis) आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या या यशामुळे गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दाम्पत्याला संविधानाची प्रत भेट दिली. एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नक्षली दाम्पत्याला 25 लाख रुपयांची मदत पुनर्वसनासाठी करण्यात आली.(Devendra Fadnavis)

नक्षलवादी कारवायांना मोठा हादरा

आत्मसमर्पित माओवाद्यांचा मेळावा व माओवाद्यांच्या कुटुंबियांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन पोलिस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले होते. आमदार देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय दैने, नक्षल विरोधी अभियानाचे महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर याचेवर 25 लाखांचे बक्षीस होते, तर त्याच्या पत्नीवर 16 लाखांचे बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ नक्षली कमांड असलेल्या या दोन्ही नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याने जिल्ह्यातील नक्षलवादी कारवायांना मोठा हादरा बसला आहे. माओवादी गतिविधीचे प्रमुख म्हणून या दोघांकडे पाहिले जायचे.(Devendra Fadnavis)

“…म्हणून या जिल्ह्याचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा”

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले की, गेल्या 4 वर्षांत जिल्ह्यातील एकही व्यक्ती नक्षली कारवायात सहभागी झाला नाही, हे यश आमच्या पोलिस दलाने मिळविले आहे. सी-60 पथकाने आपला दरारा असा निर्माण केला की, एकतर त्यांना शरणागती पत्करावी लागेल किंवा बंदुकीचा सामना करावा लागेल. ते या पथकाचे मोठे यश आहे. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाचे कंबरडे मोडले आणि दुसरीकडे सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. अंतिम माणसाच्या विकासाचाच हा प्रयत्न आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचू नये, हाच प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला. पण, आज तो विकास पोहोचतो आहे, हे मला अनेक दुर्गम भागात जाऊन पाहता आले आहे. गडचिरोली हा आमच्यासाठी महाराष्ट्राचा शेवटचा नाही, तर पहिला जिल्हा आहे. म्हणून या जिल्ह्याचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्योग, रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण यासाठी मोठा प्रयत्न हाती घेण्यात आला आहे. मोठी गुंतवणूक या जिल्ह्यात येत आहे. कालही काही प्रकल्पांबाबत मी बैठक घेतली.” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.(Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.