Rahul Gandhi यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत पुण्यात तक्रार दाखल

176
Rahul Gandhi यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत पुण्यात तक्रार दाखल
Rahul Gandhi यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत पुण्यात तक्रार दाखल

लोकसभेच्या निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) एका प्रचारसभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या भाषणात जादू करून नागरिकांना पैसे देण्याचे वक्तव्य केले होते. त्याविरोधात आता येथील नागरिक आरती कोंढरे (Aarti Kondhare) यांनी २१ जून या दिवशी सहपोलीस आयुक्त, पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत असे म्हटले आहे, ‘‘काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एप्रिल-मे २०२४ या कालावधीत जाहीर भाषणे करतांना ‘जादूटोणा करून नागरिकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील’, असे आमीष दाखवले. हे वक्तव्य सामाजिक माध्यमांत पसरली आणि नागरिकांना पैसे मिळणार, याविषयी विश्‍वास निर्माण झाला. प्रत्यक्षात नागरिकांना कोणतेही पैसे न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. पुणे परिसरातील अनेक महिलांनी त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले आहे. यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरुद्ध ‘जादूटोणा प्रतिबंधक अन् त्यांचे समूळ उच्चाटन करण्याविषयी अधिनियम २०१३ कायद्या’च्या अंतर्गत आणि फसवणूक केल्याविषयी गुन्हा नोंदवण्यात यावा.’’(Rahul Gandhi)

WhatsApp Image 2024 06 23 at 12.14.21 PM

(हेही पहा- DCM Ajit Pawar यांच्याकडून जागतिक ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा)

तक्रारदारांच्या वतीने अधिवक्ता सत्या मुळे हे प्रकरण पहात असून त्यांनीही याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले की, ‘राहुल गांधी (Rahul Gandhi) हे जादूटोणाच्या माध्यमातून पैसे मिळतील’, असे सांगतात आणि दुसरीकडे ‘भारताच्या राज्यघटनेचे संरक्षण करणार’, असेही म्हणतात. भारताचे गोरगरीब आणि अशिक्षित नागरिक यांना आमीष दाखवून, तसेच फसवणूक करून त्यांची मते मिळवण्याचा प्रकार आहे. जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा असून अशा प्रकारे आवाहन करून लोकांची फसवणूक करणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे. अशा गोष्टींना रोखण्यासाठीच देशाच्या राज्यघटनेत तरतुदी आहेत. (Rahul Gandhi)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.