CM Eknath Shinde: मी एक सामान्य कार्यकर्ता, मुख्यमंत्री नाही; मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?

121
CM Eknath Shinde: मी एक सामान्य कार्यकर्ता, मुख्यमंत्री नाही; मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?
CM Eknath Shinde: मी एक सामान्य कार्यकर्ता, मुख्यमंत्री नाही; मुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले?

नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असताना जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्था आणि शिक्षक प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ”शिक्षकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्तीलाच पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून विधान परिषदेत पाठवावे.” असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) केले.

(हेही वाचा –Russia केव्हाही India च्या मदतीला येणार; महत्त्वाच्या युद्धकराराची तयारी)

”शिक्षक हा माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा घटक असतो. त्यामुळे राज्यकर्ते म्हणून त्यांचे प्रश्न सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. याच कर्तव्य भावनेतून आजवर जुनी पेन्शन योजना असो, २० टक्के वाढीव निधी देण्यासाठी ११६० कोटींची तरतूद करणे असो, वैद्यकीय बिल आणि पेन्शनसाठी १५०० कोटींची तरतूद करणे असो किंवा २००५च्या आधीच्या शिक्षकांचा प्रश्न सोडवणे असो हे सर्वच प्रश्न या सरकारने हाती घेऊन सोडवले आहेत.” (CM Eknath Shinde)

(हेही वाचा –गडचिरोलीतील माओवादी चळवळीची कंबर मोडली: उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis)

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, ”मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर सामान्य कार्यकर्ता म्हणून राज्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. कालही, आजही आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. माझ्यातला कार्यकर्ता हा अजूनही जिवंत आहे मला कधी वाटत नाही की मी मुख्यमंत्री आहे.” असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. (CM Eknath Shinde)

(हेही वाचा –AUS vs AFG : ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक ठरले व्यर्थ! अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय)

”शिक्षकाचा समाजाशी थेट संपर्क असतो, शैक्षणिक संस्थांचा देखील अनेक लोकांशी थेट संपर्क असतो. या संस्थांच्या माध्यमातून सरकारने केलेली कामं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचायला हवे. त्यासोबतच जो तुमचे प्रश्न सोडवू शकतो अशाच उमेदवाराला निवडून देणे तुमची जबाबदारी असून त्यासाठी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कायम आग्रही असलेल्या किशोर दराडे यांना विधान परिषदेत मोठ्या मताधिक्य देऊन पाठवावे.” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (CM Eknath Shinde)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.