चित्रापुरी हिल्स, मनीकोंडा, हैदराबाद (Hyderabad News) येथे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका महिलेला 15 हून अधिक कुत्र्यांनी घेरले होते. यावेळी, महिलेने सुमारे 40 सेकंद कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव केला. त्याचा व्हिडीओ कॉलनीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओमध्ये ती महिला आधी कुत्र्यांना हाकलताना दिसते आणि नंतर अडखळत पडते. यानंतर ती पुन्हा उठते आणि जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जाते. मात्र, हे कुत्रे महिलेच्या मागे लागतात. (Hyderabad News)
जर तिच्या जागी छोटी मुले किंवा वृद्ध व्यक्ती असता तर …
काही वेळाने एक दुचाकीस्वार तेथे येतो आणि ती महिला त्याच्यापर्यंत पोहोचते. काही वेळाने एक माणूस धावत येतो आणि त्या कुत्र्यांना पळवून लावतो. या घटनेनंतर महिलेच्या पतीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून माझी पत्नी नशीबवान आहे, जर तिच्या जागी छोटी मुले किंवा वृद्ध व्यक्ती असता तर ते कसे वाचले असते? असा प्रश्न उपस्थित केला आहे. (Hyderabad News)
भटके कुत्रे पाळण्याचा सल्ला
महिलेच्या पतीने सोशल मीडियावर आपल्या कॉलनीतील भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर प्रकाश टाकला. त्यांनी तेथे राहणाऱ्या लोकांना आवाहन केले की, त्यांनी कॉलनीत भटक्या कुत्र्यांना खायला देऊ नये. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून त्यांना गेटच्या बाहेरच खायला द्या. घरात दोन पाळीव कुत्रे असल्याने कुत्र्यांवर प्रेम करणाऱ्या रहिवाशांनी उरलेले अन्न रस्त्यावर फेकण्याऐवजी 1-2 भटके कुत्रे पाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. (Hyderabad News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community