जम्मूमध्ये २६ जूनपर्यंत उष्णतेची लाट; Monsoon राज्य कधी व्यापणार? काय म्हणतयं हवामान खातं?

121
जम्मूमध्ये २६ जूनपर्यंत उष्णतेची लाट; Monsoon राज्य कधी व्यापणार? काय म्हणतयं हवामान खातं?
जम्मूमध्ये २६ जूनपर्यंत उष्णतेची लाट; Monsoon राज्य कधी व्यापणार? काय म्हणतयं हवामान खातं?

मान्सून (Monsoon) महाराष्ट्र, बिहार, झारखंड, गुजरात-महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. येत्या 3-4 दिवसांत मान्सून या सर्व राज्यांना पूर्णपणे व्यापू शकतो. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 27 जूनपर्यंत मान्सून दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये प्रवेश करू शकतो आणि 3 जुलैपर्यंत या राज्यांना पूर्णपणे कव्हर करेल. (Monsoon)

काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव

जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून गोवा आणि कर्नाटकात दाखल झाला होता. सध्या येथे मुसळधार पाऊस सुरू आहे. IMD ने आजपासून चार दिवस गोव्यात आणि आज आणि उद्या कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव संपत नाहीये. जम्मूमध्ये 26 जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. असं हवामान खात्याने म्हटलं आहे. (Monsoon)

आसाममध्ये सुमारे ४ लाख लोक पुरामुळे बाधित

आसाममध्ये जवळपास आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी 22 जून रोजी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील सुमारे 4 लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे. यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे मृतांचा आकडा 37 वर पोहोचला आहे. पूरग्रस्तांसाठी सरकारने 100 मदत छावण्या उभारल्या आहेत. त्याचबरोबर मदत साहित्य पुरवण्यासाठी १२५ केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. (Monsoon)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.