१८व्या लोकसभेचे कामकाज ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीपासून सुरू झाले. लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून सुरू होणार आहे. ३ जुलैपर्यंत चालणार आहे.
१० दिवसांत एकूण ८ बैठका होतील. सर्वप्रथम प्रोटेम स्पीकर भृतूहरी महताब राष्ट्रपती भवनात जाऊन शपथ घेतील. यानंतर ते सकाळी ११ वाजता लोकसभेत पोहोचतील.
(हेही वाचा – Hot Water Bag : गरम पाण्याची पिशवी सुरक्षितपणे वापरण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या…)
पहिले २ दिवस म्हणजे २४ आणि २५ जून रोजी प्रोटेम स्पीकर नवीन खासदारांना शपथ देतील. त्यानंतर २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राज्यसभेचे २६४ वे अधिवेशन २७ जूनपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लोकसभा-राज्यसभेच्या संयुक्त अधिवेशनात अभिभाषण करतील. यानंतर पंतप्रधान मोदी बोलणार आहेत.
दोन्ही सभागृहात चर्चा…
अधिवेशनाचे शेवटचे २ दिवस सरकार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडणार असून त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे. १० वर्षांनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना तीव्र विरोधाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या NEET परीक्षेतील गैरप्रकार, ३ फौजदारी कायदे आणि लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारातील अनियमिततेच्या आरोपांवरून विरोधक यावेळी गदारोळ माजवू शकतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community