Naxalites Attack: निमलष्करी दलाच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे २ जवान हुतात्मा

सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता.

127
Naxalites Attack: निमलष्करी दलाच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे २ जवान हुतात्मा

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी निमलष्करी (Naxalites Attack) दलातील जवानांच्या ट्रकला उडवण्यासाठी आयईडी स्फोट घडवून आणला. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान हुतात्मा झाले असून, अनेक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, जगरगुंडा भागातील कॅम्प सिल्गर येथून 201 कोब्रा कॉर्प्सची तुकडी आरओपी ड्युटीदरम्यान कॅम्प टेकलगुडेम येथे जात होती. या ताफ्यात ट्रक आणि मोटारसायकलींचा समावेश होता. सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता.

(हेही वाचा – Election: शहिदांचे फ्लॅट हडपणारे शिक्षकांचे आमदार होऊ शकत नाहीत, कपिल पाटील यांची घणाघाती टीका )

रविवारी (२३ जून) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जवानांची ट्रक येताच आयईडी स्फोट झाला. या घटनेत ट्रक चालक आणि सहचालक हुतात्मा झाले, तर इतर काही सैनिक जखमी आहेत. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. शहीद जवानांचे पार्थिव घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आले आहे. सध्या जवान या परिसरात शोधमोहीम राबवत आहेत.

बनावट नोटा जप्त
पोलीस, CRPF आणि DRG च्या टीमने सुकमा जंगलात बनावट नोटा आणि प्रिंटर मशीन जप्त केले. छाप्यादरम्यान १००, २०० आणि ५०० ​​रुपयांच्या बनावट नोटा आणि प्रिंटर मशीनही सापडले. याशिवाय शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गावकऱ्यांना फसवून नक्षलवादी बनावट नोटा बाजारात आणत होते. सुकमातील कोरागुडा भागात ही शोध मोहीम राबवण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.