मुंबई-पुणे (Mumbai-Pune Train) दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express) आणि डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) गाड्या २८ ते ३० जून या कालावधीत बंद राहतील. पुणतांबा-काणेगाव आणि दौंड-मनमाड या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे या दोन्ही एक्स्प्रेस रद्द राहतील. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस पुढील शुक्रवारी (ता. 28) रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २९) मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. त्याच दिवशी ‘पुणे-मुंबई इंटरसिटी’ही रद्द करण्यात आली आहे. रविवारी (ता. 30) मुंबई-पुणे इंटरसिटी रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचण निर्माण होऊ शकते. (Mumbai-Pune Train)
(हेही वाचा – महाराष्ट्रात अनेकांचे डोळे उघडण्याची गरज, त्यासाठी उपकरण आहे का? Raj Thackeray यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा)
तसेच इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द (Intercity Express Deccan Express canceled for three days) करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्या भरधाव वेगाने धावतात. त्यामुळे या गाड्यांवर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांनी या दिवसात सावधगिरी बाळगावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. (Mumbai-Pune Train)
(हेही वाचा – Naxalites Attack: निमलष्करी दलाच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे २ जवान हुतात्मा)
डिझेल लोको शेडच्या छतावर ९.४४ लाख किलोवॅट वीजनिर्मिती
घोरपडी येथील डिझेल लोको शेडच्या छतावर साडेसहा हजार चौरस मीटर परिसरात सोलर पॅनल बसवून रेल्वे विभागाने वीजनिर्मिती सुरू केली आहे. डिझेल लोको शेडवर बसवलेले सोलर पॅनल (Solar Pannal ) वर्षाला ९.४४ लाख किलोवॅट वीज निर्माण करतील. रेल्वेच्या वीजबिलात वर्षाला ५२ लाख रुपयांची बचत होणार आहे. घोरपडी येथे रेल्वेचे डिझेल लोको शेड आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शनिवारी येथे बसविण्यात आलेल्या ६४७ किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी डिझेल लोको शेडचीही पाहणी केली. पुणे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Mumbai-Pune Train)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community