Pimpri- Chinchwad मध्ये अवघ्या एक तासात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद !

196
Pimpri- Chinchwad मध्ये अवघ्या एक तासात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद !
Pimpri- Chinchwad मध्ये अवघ्या एक तासात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद !

पुणे शहरातील काही भागांमध्ये ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी, (२३ जून) दुपारी अचानक मुसळधार पावसाने शहरातील काही भागांमध्ये हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. अखेर ढगांच्या गडगडाटासह दुपारी जोरदार पाऊस बरसला. पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpri- Chinchwad) अवघ्या एका तासामध्ये ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागांमध्ये दुपारी साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली आणि मोशी अशा काही परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. यावर्षी पहिल्यांदाच ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली.

(हेही वाचा – France: ४३व्या जागतिक आरोग्य क्रीडा स्पर्धांमध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतल्या ४ अधिकाऱ्यांनी घडवला इतिहास )

घरातही पाणी शिरले
एका तासात तब्बल ११४ मिलिमीटर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं तसेच काही रस्त्यांवर गुडघ्याइतके पाणी पाहायला मिळालं. यामुळे शहरात महानगरपालिकेने नालेसफाई केले नसल्याचे बिंग फुटल्याचं बोललं जात आहे. नालेसफाई न झाल्याने काही भागांमध्ये घरात पाणी शिरल्याचेही बघायला मिळाले.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.