- ऋजुता लुकतुके
सुपर ८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० षटकांत १७६ धावा करणारा अमेरिकन संघ शेवटच्या दोन सामन्यांमध्ये मात्र ढेपाळला आहे. इंग्लंड विरुद्ध त्यांना २० षटकंही खेळून काढता आली नाहीत. शेवटचे शेवटचे चार फलंदाज शून्य धावा करू शकले. त्यामुळे ६ बाद ११५ वरून अमेरिकेची धावसंख्या सर्वबाद ११५ अशी झाली. ख्रिस जॉर्डनचं (Chris Jordan) तिसरं आणि सामन्यातील १९ वं षटक सनसनाटी ठरलं. जॉर्डनने (Chris Jordan) या षटकांत पहिल्या,तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूंवर चार जणांना बाद केलं. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स पाठोपाठ या स्पर्धेत दुसरी हॅट ट्रीकही त्याने साजरी केली. (T20 World Cup, Eng vs USA)
(हेही वाचा- Kannadasan: तामिळनाडू सरकारचे ‘रॉयल पोएट’ आणि प्रसिद्ध गीतकार !)
इंग्लिश संघाकडून विश्वचषक स्पर्धेत हॅट ट्रीक साजरी करणारा तो पहिली गोलंदाज ठरलाय. त्याने २.५ षटकांत १० धावा देत ४ बळी मिळवले. (T20 World Cup, Eng vs USA)
सामनावीराचा पुरस्कार मिळाला तो आदील रशिदला. कारण, त्याने जम बसलेल्या नितिश कुमार (Nitish Kumar) (३०) आणि एरॉन जोन्स (Aaron Jones) (१०) यांना बाद करत अमेरिकन फलंदाजीला सुरुंग लावला. कोरे अँडरसनने (Corey Anderson) २९ तर हरमित सिंगने (Harmeet Singh) २१ धावा केल्या. बाकी फलंदाज हजेरी लावून परतले. जॉर्डनच्या तडाख्यानंतर तर अमेरिकन संघ ११५ धावांतच गुंडाळला गेला. त्यानंतर पाळी इंग्लिश फलंदाजांची होती. जोस बटलर (Jos Buttler) आणि फील सॉल्ट (Phil Salt) यांनी बाद फेरीपूर्वी इतर फलंदाजांना विश्रांती देण्याच्याच इराद्याने फलंदाजी केली. (T20 World Cup, Eng vs USA)
(हेही वाचा- PM Narendra Modi : ‘टीम मेलोडी’पासून सावधान!)
दोघांनी ९.४ षटकांतच ११७ धावा करत सामना खिशात घातला. ज्या खेळपट्टीवर अमेरिकन फलंदाज अडखळले, तिथे इंग्लिश फलंदाजांनी सौरभ नेत्रावळकर (Saurabh Netravalkar), हरमित सिंग (Harmeet Singh), अली खान (Ali Khan) या अमेरिकन गोलंदाजांची कत्तल केली. हरमितच्या दुसऱ्या षटकांत तर बटलरने ५ षटकार खेचले. (T20 World Cup, Eng vs USA)
The reigning champions move one step closer to defending their title 🔥
England become the first team to book a spot in the #T20WorldCup 2024 semi-finals 👏#USAvENG | 📝: https://t.co/a9ojDCSPBJ pic.twitter.com/AFcV8HYaKq
— ICC (@ICC) June 23, 2024
जोस बटलरची (Jos Buttler) धावांची गाडी सुसाट होती. त्याने ३८ चेंडूंत नाबाद ८३ धावा करताना ७ षटकार आणि ६ चौकार ठोकले. तर फील सॉल्ट (Phil Salt) २१ चेंडूंत २५ धावा करून नाबाद राहिला. सुपर ८च्या दुसऱ्या गटातून आता इंग्लंडने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. तर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सामन्यातील विजेता दुसरा बाद फेरीचा संघ ठरवेल. (T20 World Cup, Eng vs USA)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community