T20 World Cup, Ind vs Aus : भारत, ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट

T20 World Cup, Ind vs Aus : ऑस्ट्रेलियासाठी करो या मरोचा सामना 

170
T20 World Cup, Ind vs Aus : भारत, ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट
T20 World Cup, Ind vs Aus : भारत, ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटमध्ये भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान असला तरी याक्षणी भारतीय खेळाडूंचा खरा खुन्नस आहे तो ऑस्ट्रेलियावर. १९ नोव्हेंबर २०२३ ही तारीख कुणीही भारतीय विसरू शकणार नाही. घरी घुसून ऑस्ट्रेलियाने युद्धासाठी तयार असलेल्या भारताची धूळधाण केली. एकदिवसीय विश्वचषक घरी नेला. खरंतर या पराभवाचा चांगलाच वचपा काढण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. सोमवारी सेंट ल्युसियामध्ये होणारा सामना जिंकून भारत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर फेकून देऊ शकतो. रविवारीच ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानकडून (Afghanistan) पराभव झालाय. त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी करो या मरो आहे. (T20 World Cup, Ind vs Aus)

(हेही वाचा- Kannadasan: तामिळनाडू सरकारचे ‘रॉयल पोएट’ आणि प्रसिद्ध गीतकार !)

पण, ऑस्ट्रेलियाचे प्रतिस्पर्धी दोन आहेत. एक भारतीय संघ आणि दुसरा पाऊस. सेंट ल्युसियामध्ये ८५ टक्के पावसाचा अंदाज आहे. सामना पावसात वाहून गेला तर ऑस्ट्रेलियाची गच्छंती जवळ जवळ निश्चित आहे. कारण, अफगाणिस्तानचा पुढील सामना बांगलादेशशी (Bangladesh) आहे. तो जिंकण्याची आशा ते बाळगू शकतात. (T20 World Cup, Ind vs Aus)

ऑस्ट्रेलियन संघ जिंकला तर सरस धावगतीच्या आधारे त्यांना बाद फेरीत पोहोचता येईल. (T20 World Cup, Ind vs Aus)

(हेही वाचा- PM Narendra Modi : ‘टीम मेलोडी’पासून सावधान!)

दुसरीकडे भारतीय संघ आहे, ज्यांनी सुपर ८ मध्ये फारसं काही चुकीचं केलेलं नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी मिळून आली आहे. संघाचा जम बसलेला आहे. सर्व खेळाडू आपापल्या भूमिकेत चपखल बसलेले आहेत. फक्त सेंट ल्युसियाला पाऊस पडणार असेल तर हवेतील ओलाव्याचा खेळपट्टीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तिसरा तेज गोलंदाज खेळवण्याचा विचार भारतीय संघ प्रशासन करू शकतं. (T20 World Cup, Ind vs Aus)

बाकी सेंट ल्युसियाची खेळपट्टीही फलंदाजांना धार्जिणी आहे. अशा मैदानावर रोहित (Rohit) आणि विराट (Virat) यांना सूर गवसला तर भारतीय संघासाठी दुसरी मोठी खुशखबर असेल. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल मार्शला (Mitchell Marsh) सूर गवसणे ही चिंतेची बाब आहे. मैदानावर मार्श विरुद्ध अर्शदीप (Arshdeep) असं एक द्वंद्वही बघायला मिळणार आहे. अर्शदीप १२ बळींसह भारताचा या स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी गोलंदाज आहे. (T20 World Cup, Ind vs Aus)

(हेही वाचा- T20 World Cup, Eng vs USA : अमेरिकेला १० गडी राखून हरवत इंग्लडचा विजयाच्या दिशेनं पाऊल )

दोन्ही संघ ३ तेज गोलंदाज घेऊन खेळतील अशीच शक्यता आहे. पण, विराट (Virat) आणि रोहित (Rohit) विरुद्ध पॉवर प्लेमध्ये फिरकीपटूचा वापर ऑस्ट्रेलिया करू शकते. कारण, दोघंही सुरुवातीच्या षटकांत फिरकीवर बाद झालेले आहेत. त्यामुळे ॲडम झुंपा विरुद्ध विराट (Virat) आणि रोहित (Rohit) असं आणखी एक द्वंद्व मैदानावर रंगू शकतं. (T20 World Cup, Ind vs Aus)

पण, हे सगळं पावसाशिवाय सामना होऊ शकला तर. (T20 World Cup, Ind vs Aus)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.