- ऋजुता लुकतुके
भारतीय महिलांनी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा ६ गडी राखून पराभव केला. विजयासाठी आवश्यक २१६ धावा भारतीय महिलांनी ४१ व्या षटकांतच करून टाकल्या. या विजयासह मालिकेतही भारताने आफ्रिकन संघाला व्हाईटवॉश दिला. उपकर्णधार स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी करत भारताची धावगती सरस ठेवली होती. तिच्या भोवती शेफाली वर्मा (Shafali Verma) (२५), प्रिया पुनिया (Priya Punia) (२८) आणि हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) ४० धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. स्मृतीने ९० धावांची खेळी रचली. त्यापूर्वी अरुंधती रेड्डीने (Arundhati Reddy) ३६ धावांत २ आणि दिप्ती शर्माने (Deepti Sharma) २७ धावांत २ बळी मिळवत आफ्रिकन फलंदाजांना जेरीला आणलं. (Smriti Mandhana)
(हेही वाचा- North West Lok Sabha Election 2024 : जोगेश्वरीत भाजपा नगरसेविकेच्या प्रभागातच किर्तीकरांना अधिक मते)
ठरावीक अंतराने फलंदाज बाद होत गेले त्यामुळे मोठी धावसंख्या रचणं आफ्रिकन संघाला शक्य झालं नाही. (Smriti Mandhana)
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 👏 👏
A dominating show from the @ImHarmanpreet-led #TeamIndia as they beat South Africa by 6⃣ wickets in the third & final ODI to complete an ODI series cleansweep! 💪 💪
Scorecard ▶️ https://t.co/Y7KFKaW91Y#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1aQYPqaQJ4
— BCCI Women (@BCCIWomen) June 23, 2024
भारतीय विजयात स्मृती मंढाणा (Smriti Mandhana) चमकली. तिने ९० धावा केल्या त्या ८३ चेंडूंत ११ चौकारांच्या सहाय्याने. त्याचबरोबर तिने फलंदाजीत एक अनोखा विक्रमही नावावर केला. ती दोन संघांदरम्यानच्या मालिकेत सर्वाधिक धावा (किमान ३ सामन्यांची मालिरा) करणारी महिला ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम जया शर्माच्या (Jaya Sharma) नावावर होता. तिने २००३-०४ साली न्यूझीलंड विरुद्ध ३ सामन्यांत ३०८ धावा केल्या होत्या. (Smriti Mandhana)
(हेही वाचा- ९०० सरकारी धान्य गोदामांची वर्षातून एकदा होणार तपासणी, State Govtच्या निर्णयाचे कारण काय ? वाचा सविस्तर)
या सामन्यात खरंतर आफ्रिकन महिलांनी चांगली सुरुवात केली होती. लॉरा वोलवार्ट (Laura Wolvaardt) (६१) आणि तझमिन ब्रिट्स (Tazmin Brits) (३८) यांनी १०८ धावांची सलामी संघाला करून दिली. पण, तनझीम बाद झाल्यावर भारतीय महिलांसाठी दरवाजे अचानक उघडले. पुढे आफ्रिकन संघाची धावगतीही कमी झाली. आफ्रिकेचे दोन फलंदाज धावचित झाले. (Smriti Mandhana)
या मालिकेत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व दाखवलं. ३ आक्रमक विजय मिळवले. स्मृती मंढाणा (Smriti Mandhana) सलग २ शतकांसह केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मालिकावीर ठरली. (Smriti Mandhana)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community