CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे रात्री उशिरा अचानक दिल्लीला रवाना, नंतर नागपुरात; मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा

CM Eknath Shinde : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीची ताकद वाढविण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे.

149
Govt Scheme: शासकीय योजनांच्या प्रचारासाठी ५० हजार योजनादूत नियुक्त करणार; नेमकं काय करणार कार्य ? वाचा सविस्तर...
Govt Scheme: शासकीय योजनांच्या प्रचारासाठी ५० हजार योजनादूत नियुक्त करणार; नेमकं काय करणार कार्य ? वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीत (loksabha election 2024) बसलेल्या फटक्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक मतदारसंघांतील पराभवाची कारणे शोधून उपाययोजना काढल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीआधी सत्ताधारी महायुतीकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत पुन्हा राज्याची सत्ता काबीज करता यावी, यासाठी सरकारच्या कामाला वेग येणं आवश्यक आहे आणि याचाच विचार करून राज्यात मंत्रीमंडळ विस्तार केला जाणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. २४ जूनच्या रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे अचानक दिल्लीला रवाना झाले होते. नवी दिल्लीत काही वेळ थांबल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे रात्रीच नागपूर येथे दाखल झाले. त्यामुळे या चर्चांचा जोर पुन्हा वाढला आहे.

(हेही वाचा – Drugs Seized : नांदेडहून मुंबईकडे होणारी गांजाची तस्करी मुंबई पोलिसांनी नगरमध्ये रोखली; १२५ किलो गांजा जप्त, चौघांना अटक)

महायुतीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न ?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीची ताकद वाढविण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. लवकरच राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. यासाठी महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांत याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही अनेक जण इच्छुक आहेत. अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २३ जूनच्या रात्री दिल्लीत जाऊन भेटीगाठी घेतल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आणखी १४ जणांना संधी ?

राज्य मंत्रिमंडळात सध्या २९ सदस्य आहेत. आणखी १४ जणांना संधी दिली जाऊ शकते. भाजप व शिंदे-अजित पवारांमध्ये ५०:२५:२५ टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार मंत्रिपदांचे वाटप केले जाऊ शकते. विस्ताराला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप मान्यता दिलेली नाही. शिंदे-फडणवीस-अजित पवारांची (CM Eknath Shinde) लोकसभा निवडणुकीपूर्वी विस्तार करण्याची इच्छा होती. मात्र त्याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मान्यता दिली नाही, असे म्हटले जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.