Terrorist Attack: रशियात दहशतवादी हल्ला, १५ जणांचा मृत्यू

204
Terrorist Attack: रशियात दहशतवादी हल्ला, १५ जणांचा मृत्यू

दहशतवाद्यांनी रविवारी (२३ जून) रशियातील (Terrorist Attack) दागेस्तानमधील २ चर्च, एक सिनेगॉग (ज्यू मंदिर) आणि पोलीस चौकीवर हल्ला केला. यामध्ये एक पादरी आणि ८ पोलिसांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला तसेच २५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर ४ दहशतवादी ठार झाले आहेत, १५ रशियन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रशियाच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी (Terrorist Attack) समितीने एका निवेदनात या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. दागेस्तानच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, सशस्त्र लोकांच्या एका गटाने सिनेगॉग आणि चर्चवर गोळीबार केला. यामध्ये ४ दहशतवादी मारले गेले. काही जण पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे.

(हेही वाचा – T20 World Cup, Afg vs Aus : ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवल्यावर अफगाण ड्रेसिंग रुममध्ये असा झाला विजय साजरा )

हल्ल्यानंतर ज्यू मंदिराला आग
अल्जझीरा न्यूज नेटवर्कनुसार, दहशतवादी हल्ल्यामुळे डर्बेटमधील एक सिनेगॉग आणि चर्चला आग लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतर हल्लेखोर कारमधून पळून जाताना दिसले. आणखी एका ज्यू मंदिरावरही दहशतवाद्यांनी गोळीबार झाला. त्यावेळी तेथे कोणीच नव्हते. त्यामुळे लोकांचे प्राण वाचले.

रशियन न्यूज एजन्सी TASSने वृत्त दिले की हल्लेखोर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दागेस्तानने या हल्ल्यासाठी युक्रेन आणि नाटो देशांना जबाबदार धरले आहे. दागेस्तानचे नेते अब्दुलखाकिम गदझियेव यांनी टेलिग्रामवर लिहिले की, ‘हे दहशतवादी हल्ले कोणत्या ना कोणत्या प्रकारे युक्रेन आणि नाटो देशांच्या गुप्तचर सेवांशी संबंधित आहेत यात शंका नाही.

रशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत युक्रेनकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. शेजारील चेचन्याचे अध्यक्ष रमजान कादिरोव्ह म्हणाले की, जे घडले ते चिथावणीखोर आणि विधानांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.