Sreeja Akula : श्रीजा अकुला टेबल टेनिस कन्टेंडर स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय 

161
Sreeja Akula : श्रीजा अकुला टेबल टेनिस कन्टेंडर स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय 
Sreeja Akula : श्रीजा अकुला टेबल टेनिस कन्टेंडर स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय 
  • ऋजुता लुकतुके

भारताची युवा टेबलटेनिसपटू श्रीजा अकुलाने (Sreeja Akula) भारतासाठी इतिहास रचला आहे. डब्ल्यूटीटी कन्टेन्डर स्पर्धेत विजेतेपद पटकावून या दर्जाची स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय महिला टेबलटेनिसपटू ठरला आहे. टेबल टेनिस जागतिक संघटनेची ही कन्टेंडर स्पर्धा आहे. अंतिम फेरीत चीनच्या डिंग यिजेचा तिने ४-१ ने पराभव केला. मस्कतमध्ये झालेल्या या सामन्यात श्रीजाने (Sreeja Akula) समयसूचकता दाखवत प्रतिस्पर्ध्या प्रमाणे आपल्या खेळात बदल केला. आणि वर्चस्व कायम राखलं. शिवाय तिची चिकाटीही यात दिसून आली. (Sreeja Akula)

त्यानंतर अर्चना कामतच्या बरोबरीने तिने दुहेरीतही विजय साकारला. दोघींनी भारताच्यात यशस्विनी घोरपडे (Yashaswini Ghorpade) आणि दया चितळे (Diya Chitale) या जोडीचा पराभव केला. या सामन्यातही श्रीजा आणि अर्चना (Archana) जोडीचंच वर्चस्व होतं. आणि सलग तीन गेममध्ये त्यांनी हा सामना जिंकला. (Sreeja Akula)

(हेही वाचा- Drugs Seized : नांदेडहून मुंबईकडे होणारी गांजाची तस्करी मुंबई पोलिसांनी नगरमध्ये रोखली; १२५ किलो गांजा जप्त, चौघांना अटक)

पुरुषांच्या दुहेरीतही भारताचा चांगलं यश मिळालं. हरमीत देसाई (Harmeet Desai) आणि मानव ठक्कर (Manav Thakkar) या भारतीय जोडीने प्रतिस्पर्धी अझिझ सोळंके (Aziz Solanke) आणि ओमाटायो (Omotayo) या जोडीचा सरळ तीन गेममध्ये पराभव केला. पण, या सगळ्या विजयांमध्ये श्रीजाची कामगिरी महत्त्वाची ठरली. कारण, एकेरीत नवीन मापदंड तिने सर केला आहे. (Sreeja Akula)

खरंतर चीनच्या तगड्या प्रतिस्पर्ध्यासमोर श्रीजाने (Sreeja Akula) पहिलाच गेम गमावला होता. पण, खेळात वेळेवर बदल करत तिने पुढील चार गेम ११-९, ११-६, ११-८ आणि ११-६ असे जिंकले. एकूणच मस्कतमधील या कन्टेंडर स्तरावरील स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली. ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदक भारताला मिळालं. यातील श्रीजाचं सुवर्ण एकेरीतील असल्यामुळे ते मोलाचं होतं. (Sreeja Akula)

(हेही वाचा- T20 World Cup, Afg vs Aus : ऑस्ट्रेलियावर सनसनाटी विजय मिळवल्यावर अफगाण ड्रेसिंग रुममध्ये असा झाला विजय साजरा)

जागतिक टेबलटेनिस संघटनेच्या कन्टेंडर स्पर्धेत एकेरीत भारताने मिळवलेलं हे पहिलं पदक आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.