राष्ट्रपतींनी भातृहरी महताब (Bhartruhari Mahtab) यांना प्रोटेम स्पीकरची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar), संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर अनेक मंत्री उपस्थित होते. भातृहरी महताब (Bhartruhari Mahtab) यांनी हिंदीतून शपथ घेतली. शपथविधीनंतर राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि इतर नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
(हेही वाचा- Sreeja Akula : श्रीजा अकुला टेबल टेनिस कन्टेंडर स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय )
अठराव्या लोकसभेचे पहिल्या अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होणार आहे. प्रोटेम स्पीकर महताब नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतील. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी 26 जून रोजी होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. राज्यसभेचे अधिवेशन गुरुवारपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी सांगितले की संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी समन्वयाची आशा आहे. आपल्या ट्विटर (एक्स) संदेशात रिजीजू म्हणाले की, अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 24 जून पासून सुरू होत आहे. मी सर्व नवनिर्वाचित सन्माननीय सदस्यांचे स्वागत करतो. संसदीय कामकाज मंत्री या नात्याने मी सदस्यांना मदत करण्यासाठी सदैव उपलब्ध राहीन. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी मी समन्वयाची अपेक्षा करतो असे रिजीजू म्हणाले. (Bhartruhari Mahtab)
लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांना येत्या दोन दिवसांसाठी हंगामी सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनेलद्वारे शपथ दिली जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2 किंवा 3 जुलै रोजी उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. (Bhartruhari Mahtab)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community