Shiv Sena UBT ला पडू लागली केंद्रातील सत्तेची स्वप्ने!

262
Shiv Sena UBT ला पडू लागली केंद्रातील सत्तेची स्वप्ने!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य खासदार अठराव्या लोकसभेत पदग्रहण शपथ घेत असताना शिवसेना उबाठाला केंद्रातील सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. विरोधी पक्षांचे २४० असलेले खासदार २७५ (बहुमतासाठी आवश्यक संख्या) कधी होतील, हे मोदी-शहा यांना कळणारही नाही, असे विधान शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले. (Shiv Sena UBT)

दहा वर्षात विरोधी पक्ष होण्याची ताकद नव्हती

एकीकडे गेल्या दहा वर्षात विरोधी पक्षनेता होण्याइतपत खासदार निवडून आणू शकण्याची ताकद नसलेल्या विरोधी पक्षांनी आता मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याऐवजी सत्तेची गणिते मांडून स्वप्न पाहू लागले आहेत. दहा वर्षानंतर लोकसभेत विरोधी पक्षनेता बसत आहे, हे मान्य करत राऊत यांना खासदारांची संख्या २४० वरुन २७५ जाण्याची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे रात्री उशिरा अचानक दिल्लीला रवाना, नंतर नागपुरात; मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा)

विरोधी पक्षांचे एकत्रित २४०; भाजपा एकटा २४१..

“विरोधी पक्षाला गेल्या दहा वर्षांमध्ये चिरडण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला, ते विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जात आहे. मोदी आणि शहा समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्यासमोर पहिल्या बाकावर बसलेला असेल. काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खासदार, आम्ही सगळे मिळून २४०. हे २४० चे २७५ कधी होतील हे मोदी शहा यांना कळणारसुद्धा नाही,” असे राऊत म्हणाले. वास्तविक, सगळ्या विरोधी पक्षांचे एकत्रित २४० खासदार लोकसभेत असून एकट्या भाजपाचे २४१ आहेत, हे राऊत सायिस्करपणे विसरले असावे. (Shiv Sena UBT)

लोकशाहीविरोधी भूमिका

एकीकडे संविधानाची प्रत घेत नव्या लोकसभेत प्रवेश करणाऱ्या उबाठाने लोकशाहीविरोधी भूमिका घेतली. लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) रवींद्र वायकर यांना खासदार पदाची शपथ घेण्यापासून रोखावे यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. तसेच न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. वायकर यांनी उबाठाचे अमोल कीर्तिकर यांचा मुंबई उत्तर-पश्चिम या लोकसभा मतदार संघात केवळ ४६ मतांनी पराभव केला तो उबाठाच्या खूपच जिव्हारी लागला आणि त्यांनी वायकर यांच्या विरोधात मोहीम उघडली. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.